World Cup : INDvsPAK : धोनीने केली निराशा पण केला नवा विक्रम! ms dhoni

World Cup : INDvsPAK : धोनीने केली निराशा पण केला नवा विक्रम! ms dhoni

पाकविरुद्धच्या सामन्यात धोनीने मैदानात उतरताच एक नवा विक्रम केला.

  • Share this:

मँचेस्टर, 16 जून: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महेंद्र सिंग धोनी केवळ एक धाव करून बाद झाला. धोनीने या सामन्यात मोठी खेळी करावी अशी सर्वांची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. पाकविरुद्धच्या या सामन्यात धोनीने मैदानात उतरताच एक नवा विक्रम केला. चौथा वर्ल्डकप खेळणाऱ्या धोनीचा हा भारताकडून 341वा एकदिवसीय सामना आहे. प्रत्यक्षात धोनीने भारताकडून 344 सामने खेळले आहेत. पण त्यातील 3 सामने आशिया इलेव्हनकडून खेळले आहेत. भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर जमा झाला आहे.

भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याबाबत धोनीने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. द्रविडने भारताकडून 340 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर देखील 344 वन डे सामने जमा आहेत. पण त्यातील 4 सामने आशिय इलेव्हन संघाकडून तर एक सामना आयसीसी इलेव्हन संघाकडून खेळला आहे. सचिनने भारताकडून सर्वाधिक 461 वनडे सामने खेळले आहेत. गेल्या 13 वर्षापासून भारतीय संघाकडून खेळणाऱ्या धोनीने देशाला तिन्ही प्रकारामध्ये विजेतेपद मिळवून दिले आहे.

VIDEO : INDvsPAK : हिटमॅनची खेळी मिस झाली का? पाहा रोहितचं झंझावाती शतक

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात मात्र धोनीला मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद आमिरच्या चेंडूवर तो 1 धाव करुन बाद झाला. धोनीच्या आधी हार्दिक पांड्य़ाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. तो बाद झाल्यानंतर चाहत्यांनी धोनीचे जोरदार स्वागत केले होते. पण धोनीची बॅट आज चालली नाही.

धोनीने 344 वनडे सामन्यात 50च्या सरासरीने 10 हजार 562 धावा केल्या आहेत. 183 ही धोनीची सर्वोच्च खेळी आहे. वनडेत त्याने 10 शतके आणि 71 अर्धशतके आहेत. इतक नव्हे तर त्याच्या नावावर एक विकेट देखील आहे. धोनीने 315 कॅच तर 121 स्टंप केले आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तर 811 चौकार आणि 225 षटकार त्याच्या नावावर आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 07:12 PM IST

ताज्या बातम्या