World Cup : धोनी खेळला कसोटी, चाहत्यांनी केलं ट्रोल!

ICC Cricket World Cup 2019 : MS Dhoni : अफगाणिस्तानच्या फिरकीविरुद्ध धोनीला धावांसाठी झगडावं लागलं. त्याने 52 चेंडूत 28 धावा केल्या.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 08:13 PM IST

World Cup : धोनी खेळला कसोटी, चाहत्यांनी केलं ट्रोल!

साउथॅम्पटन, 22 जून : ICC Cricket World Cup मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीवर टीका करण्यात येत आहे. संथगतीने फलंदाजी केल्याबद्दल त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. धोनीने अफगाणिस्तानविरुद्ध 52 चेंडूत फक्त 28 धावा केल्या. यात त्याने 3 चौकार मारले. अफगाणिस्तानच्या फिरकीसमोर त्याला फटकेबाजीच करता आली नाही. राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीसमोर त्याला धावा करता आल्या नाहीत. धोनी एक एक धाव काढण्यासाठी धडपडताना दिसत होता. त्याने फिरकीपटूंच्या 43 चेंडूंचा सामना करताना फक्त 12 धावा केल्या. धोनीने वनडेत कसोटी खेळली अशी टीकाही त्याच्यावर होत आहे.

संथ खेळी करणारा धोनी 45 व्या षटकात राशिद खानच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात यष्टीचित झाला. राशिदने टाकलेला चेंडू इकराम अलीखिलच्या हातात गेला. त्याने क्षणार्धात यष्ट्या उडवल्या.

Loading...

महेंद्रसिंग धोनी आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त दुसऱ्यांदा यष्टीचित झाला आहे. याधीसुद्धा तो लेग स्पिनरच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीला देवेंद्र बिशूने बाद केलं होतं.

विराट कोहली बाद झाला तेव्हा भारताच्या 31 षटकांत 135 धावा झाल्या होत्या. त्यानंतर पुढच्या 10 षटकांत धोनी आणि केदार जाधव यांनी फक्त 40 धावा केल्या. यातही गुलबदीन नैबच्या गोलंदाजीवर 15 धावा झाल्या होत्या. म्हणजे 8 षटकांत 25 धावाच करता आल्या. भारताच्या इतर फलंदाजांनाही फारशा धावा काढता आल्या नाहीत. कर्णधार विराट कोहली वगळता इतर सर्व फलंदाज धावांसाठी धडपडत होते. कोहलीने 63 चेंडूत 67 धावांची खेळी केली.

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...