चाहत्यांसाठी खूशखबर! धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही

चाहत्यांसाठी खूशखबर! धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही

धोनी भारतात किंवा बाहेर संघासोबत गेला तरी तो अंतिम 11 जणांमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्याऐवजी ऋषभ पंतवर यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेतनंतर भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीचं 2019 चा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं. हा त्याचा अखेरचा वर्ल्ड कप होता. त्यानंतर तो निवृत्ती घेणार अशी चर्चा आहे. मात्र, तो निवृत्ती कधी जाहीर करणार हे कोणालाही माहिती नाही.

भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये धोनी संघात नसेल आणि तो काही दिवसांत निवृत्त होईल अशी चर्चा आहे. मात्र, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार धोनी इतक्यात निवृत्ती घेणार नाही. त्याआधी त्याला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही.

भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत ऋषभ पंत सेट होत नाही तोपर्यंत धोनी संघात असेल. दरम्यान धोनी संघासोबत राहून पंतला मार्गदर्शन करेल.

दरम्यान, निवड समितीनं धोनीच्या जागा कोण घेणार यासाठी तयारी सुरु केली आहे. धोनी 38 वर्षांचा असल्यामुळे 2023च्या वर्ल्ड कपमध्ये तो भारताकडून खेळण्याच्या शक्यता कमी आहेत. त्यामुळं भारताला पुढच्या वर्ल्ड कपसाठी विकेटकिपर आणि फिनिशर अशा दोन्ही भुमिका बजावणारा खेळाडूची गरज आहे. यात आयपीएल गाजवणाऱ्या ऋषभ पंत, इशान किशन किंवा संजु सॅमसन यांची वर्णी लागू शकते. या तिघांमध्ये ऋषभ पंत आघाडीवर आहे.

World Cup Final पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर ICC ने दिली पहिली प्रतिक्रिया!

VIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक

First published: July 17, 2019, 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading