धोनीची वेळ संपली, आता या खेळाडूला मिळणार विकेटकीपर म्हणून संधी!

धोनीची वेळ संपली, आता या खेळाडूला मिळणार विकेटकीपर म्हणून संधी!

भारतीय संघाची घोषणा करताना निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी धोनी संदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जुलै: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ टी-20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघात महेंद्रसिंग धोनीला संधी देण्यात आलेली नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी धोनीला संघातून वगळण्यात आल्याची चर्चा होती. पण धोनीने स्वत: या मालिकतून त्याला वगळण्याची मागणी केली होती. त्यामुळे धोनीचा या संघात समावेश नाही. भारतीय संघाची घोषणा करताना निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी धोनी संदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे.

धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपलब्ध नाही. पण पुढील वर्ल्ड कपसाठी आम्ही रोड मॅप तयार केला आहे. 2023मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पंतला अधिक संधी दिली जाणार आहे. यासंदर्भात आम्ही धोनी सोबत चर्चा केल्याचे प्रसाद म्हणाले. वेस्ट इंडिज दौऱ्यातील भारतीय खेळाडूंची नावे जाहीर करताना प्रसाद यांनी अप्रत्यक्षपणे धोनीची वेळ संपली आहे. आता पंतला अधिक संधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, सिखर धवन, विराट कोहली(कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

टी20 संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी

कसोटी संघ : मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, अश्विन, जडेजा, कुलदीप यादव इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

VIDEO: मनोरुग्णाचा ब्रिजवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न

Published by: Akshay Shitole
First published: July 21, 2019, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading