धोनीने लष्कराच्या वर्दीत केला सॅल्यूट, VIDEO VIRAL

धोनीने लष्कराच्या वर्दीत केला सॅल्यूट, VIDEO VIRAL

भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेतली असून तो दोन महिने लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रेनिंग घेणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जुलै : भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडणार आहे. धोनी विंडीज दौऱ्यावर जाणार नाही म्हणजे तो निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली होती. धोनी दोन महिने विश्रांती न घेता भारताच्या लष्करात पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रेनिंग घेणार असल्याचं स्पष्ट झालं. धोनीला मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आलं आहे. तो पॅराशूट रेजिमेंटच्या 106 बटालियनमध्ये तैनात आहे.

धोनीला लष्करप्रमुखांनी रेजिमेंटमध्ये ट्रेनिंगसाठी परवानगी दिली आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये धोनी लष्कराच्या गाडीतून उतरून जय हिंद म्हणत सलाम करताना दिसत आहे. धोनीचा हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा असून आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

धोनीने आपण विंडीज दौऱ्यातून माघार घेत असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. त्यानंतर धोनी दोन महिने काय करणार याची चर्चा सुरू होती.धोनी भारतीय लष्करातील पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. त्याला मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे धोनी आता लष्करात सेवा बजावणार आहे. मात्र, धोनी लष्करात जाऊन काय करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला लष्करप्रमुखांनी सैन्यासोबत सराव करण्याची परवानगी दिली आहे. धोनी पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असल्यानं त्या रेजिमेंटमधूनच सराव करणार आहे. या रेजिमेंटचा सराव जम्मू आणि काश्मिरमध्ये होणार आहे. धोनीला सरावात भाग घेता येणार असला तरी लष्कराच्या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

चहलने सरकारी नोकरीसाठी फिल्डिंग करताना घातला होता चष्मा!

World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

VIDEO : प्रसिद्ध अमेरिकी टेनिसपटूच्या लग्नात बॉलिवूडच्या 'या' गाण्यानं धम्माल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 12:27 PM IST

ताज्या बातम्या