नवी दिल्ली, 22 जुलै : World Cup नंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर करण्यात आला. त्यापूर्वीच भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आपण विंडीज दौऱ्यातून माघार घेत असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. त्यानंतर धोनी दोन महिने काय करणार याची चर्चा सुरू होती. तो भारतीय लष्करासोबत काम करणार असल्याचं समोर आलं. पण लष्करात धोनी नक्की काय काम करणार याबद्दल मात्र समजू शकले नव्हते.
धोनी भारतीय लष्करातील पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. त्याला मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे धोनी आता लष्करात सेवा बजावणार आहे. मात्र, धोनी लष्करात जाऊन काय करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला लष्करप्रमुखांनी सैन्यासोबत सराव करण्याची परवानगी दिली आहे. धोनी पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असल्यानं त्या रेजिमेंटमधूनच सराव करणार आहे. या रेजिमेंटचा सराव जम्मू आणि काश्मिरमध्ये होणार आहे. धोनीला सरावात भाग घेता येणार असला तरी लष्कराच्या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे.
Top Army Sources: MS Dhoni’s request to train with the Indian Army has been approved by General Bipin Rawat. He would train with the Parachute Regiment battalion. Some part of the training is also expected to take place in J&K. Army won't allow Dhoni to be part of any active Op. pic.twitter.com/jMCHExc9JS
— ANI (@ANI) July 21, 2019
भारतीय संघाची घोषणा करताना निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी धोनी संदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपलब्ध नाही. पण पुढील वर्ल्ड कपसाठी आम्ही रोड मॅप तयार केला आहे. 2023मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पंतला अधिक संधी दिली जाणार आहे. यासंदर्भात आम्ही धोनी सोबत चर्चा केल्याचे प्रसाद म्हणाले. वेस्ट इंडिज दौऱ्यातील भारतीय खेळाडूंची नावे जाहीर करताना प्रसाद यांनी अप्रत्यक्षपणे धोनीची वेळ संपली आहे. आता पंतला अधिक संधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.
वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडण्याच्या तयारीत, निवृत्तीनंतर जाणार परदेशात
World Cupमध्ये घेतला पण विंडीज दौऱ्यातून वगळला, निवड समितीने सांगितलं कारण
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा