...आणि म्हणून धोनीच्या हेल्मेटवर भारताचा तिरंगा नाही!

...आणि म्हणून धोनीच्या हेल्मेटवर भारताचा तिरंगा नाही!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ओपनर रोहित शर्माला जेव्हा आपण खेळताना पाहतो तेव्हा त्यांच्या हेलमेटवर आपल्या भारताचा तिरंगा नेहमी दिसतो. पण...

  • Share this:

01 मार्च : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ओपनर रोहित शर्माला जेव्हा आपण खेळताना पाहतो तेव्हा त्यांच्या हेलमेटवर आपल्या भारताचा तिरंगा नेहमी दिसतो. पण माजी भारतीय कर्णधार आणि विद्यमान विकेटकीपर एम. एस. धोनीच्या हेलमेटवर मात्र हो तिरंगा दिसत नाही. त्याच्या हेल्मेटवर नेहमी बीसीसीआईचा लोगो दिसतो. धोनीच्या हेलमेटवर तिरंगा नसल्याचं कारण खूप खास आहे. ते कारण समजल्यावर तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल.

खरंतर धोनी एक विकेटकीपर आहे. त्यामुळे जेव्हा तो फील्डवर खेळण्यासाठी जातो तेव्हा अनेक वेळा त्याला त्याचं हेलमेट काढावं लागतं आणि ते मैदानवर ठेवावही लागतं. आता हे असताना जर धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा असता तर ते हेलमेट खाली ठेवल्याने तिरंग्याचा अपमान झाला असता. आणि वारंवार ते हेल्मेट मैदानाबाहेर ठेवण्यासाठी नेलं तर त्यात वेळ जातो. म्हणून धोनीच्या हेल्मेटवर भारताचा तिरंगा नसतो.

नियमांनूसार आपलं राष्ट्रीय ध्वज जमीनीवर पडू देऊ नये किंवा ते कोणत्याही वस्तूसोबत खालीही ठेऊ नये. त्यामुळे धोनीने हेल्मेटला तिरंगा न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या देशाप्रती धोनीला असलेल्या या आदराबद्दल त्याच्या चाहत्यांकडून त्याचं स्वागतं केलं जात आहे.

 

First published: March 1, 2018, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading