रांची, 3 फेब्रुवारी : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) मुलगी झिवा (Ziva) सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. झिवाचं वेगळं इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंट आहे. झिवाची आई साक्षी (Sakshi Dhoni) हे अकाऊंट चालवते. झिवाला तब्बल 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.
महेंद्रसिंह धोनी निवृत्तीनंतर त्याच्या रांचीतील फार्म हाऊसमध्ये (Dhoni Ranchi Farmhouse) जैविक शेती करत आहे. या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड धोनी करतो. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये झिवा देखील तिच्या बाबांप्रमाणे भाज्यांमध्ये रमली आहे.
सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये (VIDEO) झिवा भाज्यांसमोर बसली आहे. या सर्व भाज्या तिनं स्वत: शेतामधून निवडल्या आहेत. साक्षी तिला या भाज्यांचं नावं विचारते. त्यावेळी झिवा त्या सर्व भाज्यांचं नाव अचूक सांगते. त्यानंतर झिवा तिच्याला आईला आपली आवडती भाजी गाजर असल्याचं सांगते. झिवाचा हा गोड व्हिडीओ तिच्या फॅन्समध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
View this post on Instagram
झिवा आणि धोनीची पहिली जाहिरात काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली होती. धोनी आणि झिवा कॅडबरी ओरिओ बिस्कीटच्या (Cadbury Oreo biscuits) जाहिरातीमध्ये एकत्र आले होते. या जाहिरातीमधील बाप-लेकीची केमिस्ट्री चांगलीच गाजली आहे.
(हे वाचा-‘मला आजही रडू आवरत नाही,’ हार्दिक पांड्यानं शेअर केला वडिलांचा इमोशनल VIDEO)
धोनी नव्या इनिंगमध्येही व्यस्त!
ICC क्रिकेट वर्ल्ड 2019 नंतर धोनी वर्षभरापेक्षा जास्त काळ क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर 15 ऑगस्ट 2020 या दिवशी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. सध्या धोनी हा चेन्नई सुपर किंग्स (CSK) या आयपीएल टीमचा कॅप्टन आहे. धोनीनं रांचीतल्या फार्म हाऊसमध्ये शेतीचे प्रयोग सुरु केले आहेत. त्याच्या फार्म हाऊसमधील भाज्या या दुबईमध्ये विकल्या जातात. धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इनिंग संपलेली असली तरी तो रिटायरमेंटनंतरच्या नव्या इनिंगमध्येही व्यस्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni, Sakshi dhoni