Army कॅम्पमधील धोनीचा पहिला फोटो; जवानांनी घेरलं आणि...

Army कॅम्पमधील धोनीचा पहिला फोटो; जवानांनी घेरलं आणि...

धोनीचा भारतीय लष्कराच्या कॅम्पमधील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा दोन महिन्यासाठी भारतीय लष्करासोबत काम करत आहे. काल ३१ जुलै रोजी धोनी लष्करी सेवेला सुरुवात केली. धोनीचा भारतीय लष्कराच्या कॅम्पमधील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी लष्करी जवानांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. इतक नव्हे तर धोनीला जवानांनी घेरल्याचे दिसत आहे. धोनी त्याच्या लष्करातील सहकाऱ्यांना बॅटवर स्वाक्षरी देत आहे.

वर्ल्ड कपनंतर धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाता लष्करात सामिल होण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारपासून धोनी पॅराशूट रेजिमेंटमध्ये दाखल झाला. याआधी त्याने सराव देखील केला होता. धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत सैन्यासोबत सराव करणार आहे. या कालावधीत धोनी 106 क्षेत्रीय सेनेसोबत राहत सराव करणार आहे. दरम्यान या अंतर्गत धोनी लष्करातील सर्वात खतरनाक असलेल्या विक्टर फोर्समध्ये धोनी ट्रेनिंग घेणार आहे. यात पेट्रोलिंग गार्ड आणि पोस्ट ड्युटी या सारख्या जबाबदाऱ्या धोनी सांभाळणार असल्याची लष्करी अधिकाऱ्याची माहिती दिली.

Victor Forceमध्ये जॉईन झालाय धोनी; नाव ऐकलं की दहशतवाद्यांना भरते धडकी!

80च्या दशकात राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळं उत्तर-पूर्व राज्यातील दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1990मध्ये राष्ट्रीय रायफ्सल फोर्सची स्थापना करण्यात आली. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स विभागाची पाच युनिटमध्ये विभागणी करण्यात आली होती. यात रोमियो फोर्स, डेल्टा फोर्स, व्हिक्टर फोर्स, किलो फोर्स आणि युनिफॉर्म फोर्स यांचा समावेश आहे. काश्मीच्या घाट परिसरात व्हिक्टर फोर्सची नियुक्ती केली जाते.

व्हिक्टर फोर्सला काऊंटर टेरेरिस्ट फोर्स असे देखील म्हटले जाते. या फोर्समधील जवानांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा प्रभाव असलेल्या भागात केली जाते. भारतीय लष्करातील हा विभाग काऊंटर इंसरजेंसी (CIF)म्हणून काम करत असतो.

व्हिक्टर फोर्समधील जवानांची नियुक्ती काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग, पुलवामा, शोपियां, कुलगाम आणि बडग्राम या ठिकाणी केली जाते. हे भाग काश्मीरमधील दहशतवादाचा अधिक प्रभाव असलेले आहेत. शहर, गाव आणि जंगलात या फोर्समधील जवानांची नियुक्ती केली जाते. या फोर्समध्ये भूदल, हवाई दल आणि लष्करातील इंजिनिअरिंग विंगमधील जवान देखील असतात.

महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. याअंतर्गत धोनी 2015मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. आग्रा येथे ट्रेनिंग धोनीनं विशेष प्रशिक्षण घेतले होते. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर धोनी लष्करात सामिल होण्याची तयारी करत आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.

VIDEO : महाजनादेश यात्रेत राजनाथ सिंग बोलायला उभे राहिले, लोकं मंडपाबाहेर पडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Aug 1, 2019 08:45 PM IST

ताज्या बातम्या