Home /News /sport /

टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, जर्सीवर दिसणार हे नाव

टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, जर्सीवर दिसणार हे नाव

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय क्रिकेट टीम (Team India) नव्या किट स्पॉन्सरसह मैदानात उतरणार आहे. एमपीएल स्पोर्ट्स (MPL Sports) सोबत बीसीसीआय (BCCI) चा अधिकृत किट स्पॉन्सरसाठीचा करार झाला आहे.

    मुंबई, 17 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय क्रिकेट टीम (Team India) नव्या किट स्पॉन्सरसह मैदानात उतरणार आहे. एमपीएल स्पोर्ट्स (MPL Sports) सोबत बीसीसीआय (BCCI) चा अधिकृत किट स्पॉन्सरसाठीचा करार झाला आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. भारतीय पुरुष क्रिकेट टीम, भारतीय अंडर-19 टीम आणि भारतीय महिला टीम यांच्या जर्सीसाठी एमपीएल आणि बीसीसीआय यांच्यात तीन वर्षांचा करार झाला आहे. मोबाईल प्रिमियर लीग (MPL) भारतातला सगळ्यात मोठा ई-स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म आहे. एमपीएल स्पोर्ट्स आणि बीसीसीआय यांच्यात नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2023 या तीन वर्षांसाठी करार झाला आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून या कराराला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय क्रिकेट टीम एमपीएल स्पोर्ट्सने तयार केलेल्या आणि डिझाईन केलेल्या किटमध्ये दिसेल. टीम इंडियाच्या जर्सीशिवाय एमपीएल स्पोर्ट्स लायसन्सप्राप्त टीम इंडियाचं दुसरं सामानही विकू शकणार आहेत. 'आम्ही एमपीएल स्पोर्ट्स सारख्या युवा भारतीय ब्रॅण्डसोबत काम करण्यास उत्सुक आहोत. यामुळे भारताच्या क्रिकेट प्रेमींना टीम इंडिया वापरत असलेल्या वस्तूही सहज मिळतील. यामध्ये भारतातल्याच नाही तर जगातल्या क्रिकेट रसिकांसाठी प्रतिष्ठित असलेली टीम इंडियाची जर्सीही समाविष्ट आहे,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली. '2023 पर्यंत भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट टीमचं कीट प्राजोयक म्हणून एमपीएल स्पोर्ट्सची नियुक्ती झाली आहे. भारतीय क्रिकेटसाठी नव्या युगाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे,' असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले आहेत. एमपीएल स्पोर्ट्स मास्क, मनगटाचा बॅण्ड, बूट, हेड गियर यांच्यासारखी खेळाची उत्पादन विकत आहे. याशिवाय एमपीएल स्पोर्ट्सची योजना कपडे आणि क्रीडा सामानाचं उत्पादन करण्याचीही आहे. टीम इंडियाच्या कीटची स्पॉन्सरशीप मिळाल्यामुळे त्यांना आता जर्सी आणि किटमधल्या इतर गोष्टींचंही उत्पादन करता येईल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या