• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर जिवलग मित्र विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर जिवलग मित्र विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

एबी डिव्हिलियर्सनं ( AB de Villiers) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याचा जिवलग मित्र आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर:  दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि जगातील महान बॅटरपैकी एक असलेल्या एबी डिव्हिलियर्सनं ( AB de Villiers) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2018 सालीच निवृत्त झाला होता. आता तो आयपीएल आणि अन्य कोणत्याही क्रिकेट लीगमध्ये खेळणार नाही. त्याच्या निवृत्तीनं त्याचा जिवलग मित्र आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच भावुक झाला आहे. विराट आणि डिव्हिलियर्स 2011 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीममध्ये एकत्र होते. या दोघांनी अनेक दमदार पार्टनरशिप एकत्र केल्या आहेत. मैदानात आणि मैदानाच्या बाहेरही दोघांमधील केमिस्ट्री प्रसिद्ध आहे. डिव्हिलियर्सचा जिवलग मित्र असलेल्या विराटनं या सिझननंतर आरसीबीची कॅप्टनसी सोडली आहे. तर आता डिव्हिलिर्यसनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आरसीबीमधील एका युगाचा शेवट झाला आहे. विराटनं एक  ट्विट करत डिव्हिलियर्सच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'आमच्या काळातील बेस्ट खेळाडू आणि मला भेटलेला सर्वात प्रेरणादायी व्यक्ती. माझ्या भावा, तू आजवर दे काही केलंस, तसंच आरसीबीला जे दिलं आहेस त्याचा नेहमीच अभिमान बाळग. आपल्यातील नातं हे खेळाच्या पलिकडचं आहे आणि नेहमी असेल.' तुझ्या या निर्णयाचा मला त्रास होत आहे. पण, तू नेहमीप्रमाणे तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी सर्वोत्त निर्णय घेतला आहेस हे मला माहिती आहे. आय लव्ह यू ' असं ट्विट करत विराटनं एबीडीला त्यामध्ये टॅग केलं आहे. 'मिस्टर 360 डिग्री' ने निवृत्तीची घोषणा करताच RCB ला मोठा धक्का, केले भावुक ट्विट डिव्हिलियर्सनं आरसीबीकडून 157 मॅच खेळल्या. यामध्ये त्यानं 158.33 च्या स्ट्राईक रेटनं 4522 रन केले. यामध्ये 37 आणि अर्धशतक आणि 2 शतकांचा समावेश आहे. आरसीबीकडून सर्वाधिक रन काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटनंतर त्याचा क्रमांक आहे.
  Published by:News18 Desk
  First published: