Home /News /sport /

IND vs AUS : विराट का धोनी, दशकातला सर्वोत्तम खेळाडू कोण? गावसकर-हेडन यांच्यात मतभेद

IND vs AUS : विराट का धोनी, दशकातला सर्वोत्तम खेळाडू कोण? गावसकर-हेडन यांच्यात मतभेद

क्रिकेटच्या या दशकातला सर्वोत्तम खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) का एमएस धोनी (MS Dhoni), सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आणि मॅथ्यू हेडन (Mathew Hayden) यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : 2010 ते 2020 या दशकातला सर्वोत्तम खेळाडू कोण? याबाबत आयसीसी (ICC) क्रिकेट चाहत्यांचा पोल घेत आहे. यासाठी आयसीसीने प्रत्येक विभागतल्या खेळाडूंचे पर्याय चाहत्यांना दिले आहेत. या प्रत्येक विभागातला एक पर्याय निवडण्याची मुभा रसिकांना आहे. मागच्या 10 वर्षातला सर्वोत्तम खेळाडू कोण, यावर माजी क्रिकेटपटूही त्यांची मतं मांडत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यामते मागच्या 10 वर्षातला विराट कोहली (Virat Kohli) सगळ्यात प्रतिभावान खेळाडू आहे, कारण विराटने भारताला मॅच जिंकवून दिल्या आहेत, असं गावसकर म्हणाले. विराटने 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट सगळ्यात जलद 12 हजार वनडे रन करणारा खेळाडू बनला. विराटने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर असलेला विक्रम मोडला. 'वैयक्तिक कामगिरी बघतली, तर निश्चितच विराट कोहली अव्वल आहे. आव्हानाचा पाठलाग करताना त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने बऱ्याच मॅचमध्ये विजय मिळवला,' असं गावसकर स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात म्हणाले. 'मी फक्त रन आणि विकेटच्या संख्येऐवजी खेळाडूचा प्रभाव बघतो. या दशकात विराट कोहलीनेच जास्त प्रभाव टाकला, असं आपल्याला मान्य करावं लागेल. भारतीय टीमने ज्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, त्या मॅचमध्ये विराटची कामगिरी सर्वोत्तम होती,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. गावसकर यांच्या या मताशी मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन (Mathew Hayden) सहमत नाही. एमएस धोनी (MS Dhoni) हा या दशकातला सर्वोत्तम प्रभावी भारतीय खेळाडू आहे, असं हेडन म्हणाला. धोनीने याचवर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 'धोनीने वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला. माझ्यासाठी वर्ल्ड कप जिंकणं हा मैलाचा दगड आहे. जेव्हा वर्ल्ड कप येतो तेव्हा तुम्हाला चांगला कर्णधार असल्यासोबतच मधल्या फळीत शांत आणि दमदार खेळाडूही असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी धोनीमध्ये आहेत,' असं हेडनला वाटतं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या