Home /News /sport /

IND vs AUS : आत्महत्या करणार होता हा क्रिकेटपटू, 3 वर्षानंतर टीममध्ये मिळाली जागा

IND vs AUS : आत्महत्या करणार होता हा क्रिकेटपटू, 3 वर्षानंतर टीममध्ये मिळाली जागा

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाने टीमची घोषणा केली आहे. 3 वर्षानंतर हेनरिक्स (Moises Henriques) चं ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

    मुंबई : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाने टीमची घोषणा केली आहे. 18 खेळाडूंच्या या टीममध्ये ऑस्ट्रेलियाने ऑलराऊंडर मोयसेज हेनरिक्स यालाही संधी दिली आहे. 3 वर्षानंतर हेनरिक्स (Moises Henriques) चं ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पुनरागमन झालं आहे. हेनरिक्सला मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यामुळे संधी देण्यात आली आहे. खराब कामगिरीनंतर हेनरिक्सला ऑस्ट्रेलियाने डच्चू दिला होता. पण मागच्यावर्षी बिग बॅश लीगमध्ये हेनरिक्सने सिडनी सिक्सर्सना ट्रॉफी जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे त्याचं ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पुनरागमन झालं. हेनरिक्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फारशी चांगली राहिलेली नाही. 33 वर्षांच्या या ऑलराऊंडरने 4 टेस्ट मॅचमध्ये 23.42 च्या सरासरीने 164 रन केले, याशिवाय त्याने 11 वनडे मॅचमध्ये 9 च्या सरासरीने 81 रन केले. हेनरिक्सने 11 टी-20 मॅचमध्ये 31.80 च्या सरासरीने 159 रन बनवले. 10 ऑक्टोबर 2017 साली हेनरिक्सने भारताविरुद्ध शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. आता भारताविरुद्धच तो टीममध्ये पुनरागमन करत आहे. आत्महत्या करणार होता हेनरिक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या खराब कामगिरीनंतर हेनरिक्स डिप्रेशनमध्ये गेला होता, त्याच्या मनात एकदा आत्महत्या करण्याचा विचारही आला होता. एका पॉडकास्ट दरम्यान हेनरिक्सनं आपण आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं. डिप्रेशनमुळे आपण 1 ते 2 तासही झोपत नव्हतो, जवळपास 3 महिने वाईट काळातून मी गेलो, त्यावेळी माझं वजन 10 किलो कमी झालं, असं हेनरिक्स म्हणाला होता. यामधून हेनरिक्सने स्वत:ला सावरलं आणि आता त्याने पुन्हा एकदा टीममध्ये पुनरागमन केलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या