मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /वडिलांच्या मृत्यूनंतरचे 14 दिवस सिराजसाठी होते भयंकर! मियाँभाईची गोष्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

वडिलांच्या मृत्यूनंतरचे 14 दिवस सिराजसाठी होते भयंकर! मियाँभाईची गोष्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

भारतीय क्रिकेटमधील जिद्द, ध्यास आणि अभिमान यांचा समावेश असलेली सिराजची (Mohammed Siraj) ही गोष्ट आहे. मिशन डॉमिनेशन: एन अनफिनिश्ड क्वेस्ट (Mission Domination: An Unfinished Quest) या नव्या पुस्तकात या संघर्षाचा खुलासा करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 19 ऑगस्ट : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यात तसंच इंग्लंडमध्ये लॉर्ड्स टेस्ट जिंकण्यात मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) बॉलिंगचं मोठं योगदान आहे. फक्त 7 टेस्टमध्येच सिराज टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड बनला आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये 8 विकेट्स घेत सिराजनं आपल्याला ऑस्ट्रेलियात मिळालेलं यश हा अपघात नव्हता हे दाखवून दिल आहे. हैदराबादच्या सामान्य घरातील  सिराजचा इथवरचा प्रवास हा मोठ्या संघर्षाचा आणि भाविनक वळण लाभलेला आहे.

भारतीय क्रिकेटमधील जिद्द, ध्यास आणि अभिमान यांचा समावेश असलेली सिराजची ही गोष्ट आहे. मिशन डॉमिनेशन: एन अनफिनिश्ड क्वेस्ट (Mission Domination: An Unfinished Quest) या नव्या पुस्तकात सिराजच्या या संघर्षाचा खुलासा करण्यात आला आहे. बोरिया मजूमदार (Boria Majumdar) आणि कुशान सरकार हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

सिराज होता एकटा!

या पुस्तकातील माहितीनुसार टीम इंडिया गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी कोरोनामुळे सर्व खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक होते. याच काळात सिराजचे वडील मोहम्मद गौस (Mohammed Ghaus)  यांचे निधन झाले. कोरोनो प्रोटोकॉलमुळे टीम इंडियाचा कोणताही खेळाडू त्याच्या रूममध्ये जावून सिराजचं सांत्वन करु शकत नव्हता. भारतीय खेळाडूंनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोनाचे नियम मोडू नयेत म्हणून प्रत्येक खोलीच्या बाहेर पोलिसांचा पहारा होता. त्यांच्यावर कैद्यासारखी नजर ठेवली जात होती. हे खेळाडू ऑस्ट्रेलियात व्हायरस पसरवण्यासाठीच आले आहेत, असं चित्र होतं.

त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू रोज व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सिराजच्या संपर्कात होते. तो काही चुकीचं पाऊल उचलणार नाही ना? याची सर्वांना भीती होती. टीम इंडियाचे फिजिओ नितीन पटेल यांनाच फक्त सिराजच्या रूममध्ये जाण्याची परवानगी होती.

IND vs ENG: '....तर टीम इंडियाला जशास तसं उत्तर देऊ', इंग्लंडच्या कोचचा गंभीर इशारा

सिराजनं केलं वडिलांचं स्वप्न पूर्ण

सिराजसाठी तो सर्वात खडतर कालखंड होता. त्या काळात तो अनेकदा उन्मळून पडला. पण, पुन्हा उभा राहिला. टीम इंडियाच्या जर्सीत सिराजनं खेळावं हे त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याचं सिराजचं ध्येय होतं. त्याला बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या टेस्टमध्ये सिराजनं चांगली बॉलिंग केली. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियातील मालिकेत भारताकडून सर्वात जास्त विकेट्सही घेतल्या.

First published:

Tags: Cricket news, India vs england