मोहम्मद अझहरुद्दीननं काढले 54 बॉलमध्ये 137 रन्स, 11 सिक्स आणि 9 फोरची बरसात!

मोहम्मद अझहरुद्दीननं काढले 54 बॉलमध्ये 137 रन्स, 11 सिक्स आणि 9 फोरची बरसात!

केरळच्या मोहम्मद अझहरुद्दीननं (Mohammed Azharuddeen) आक्रमक बॅटींग करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अझहरुद्दीननं 20 बॉलमध्ये अर्धशतक तर फक्त 37 बॉलमध्ये शतक झळकावलं.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) जबरदस्त बॅटिंगचा धडाका सुरु आहे. आता केरळच्या मोहम्मद अझहरुद्दीननं (Mohammed Azharuddeen) आक्रमक बॅटींग करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अझहरुद्दीननं 20 बॉलमध्ये अर्धशतक तर फक्त 37 बॉलमध्ये शतक झळकावलं. हे या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचं वेगवान शतक आहे.

मुश्ताक अली स्पर्धेत बुधवारी केरळची लढत मुंबईशी होती. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईनं पहिल्यांदा बॅटींग केली. त्यांनी केरळसमोर 197 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. केरळनं ते लक्ष्य 16 व्या ओव्हर्समध्ये फक्त 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

केरळची आक्रमक सुरुवात

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना केरळला आक्रमक सुरुवातीची गरज होती. रॉबिन उथप्पा आणि अझहरुद्दीननं ती गरज पूर्ण केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 9.3 ओव्हर्समध्येच 129 रन काढले होते. उथप्पा 33 रन काढून आऊट झाला.

अझहरुद्दीनचं आक्रमक शतक

अझहरुद्दीननं दुसऱ्या बाजूनं आक्रमक खेळ सुरु ठेवला. त्यानं 54 बॉलमध्ये नाबाद 137 रनची आक्रमक खेळी केली. या खेळीच्या दरम्यान त्यानं 11 सिक्स लगावले. संजू सॅमसननं (Sanju Samson) 12 बॉलमध्ये 22 रन काढले.

ऋषभ आणि रोहितनंतर अझहरुद्दीन!

अझहरुद्दीनंचं हे मुश्ताक अली स्पर्धेतील दुसरं वेगवान शतक आहे. तर कोणत्याही भारतीयांकडून झळकावलेलं तिसरं वेगवान शतक आहे. मुश्ताक अली स्पर्धेत ऋषभ पंतनं (Rishabh Pant) 32 बॉलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध 35 बॉलमध्ये शतक झळकावलं आहे. त्यानंतर अझहरुद्दीनचा नंबर येतो. युसूफ पठाणनंही आयपीएल स्पर्धेत 37 बॉलमध्ये शतक झळकावलं आहे.

मुंबई अडचणीत

मुंबईकडून पहिल्यांदा बॅटिंग करताना यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी आक्रमक खेळी केली होती. यशस्वीनं 40 तर सूर्यकुमारनं 38 रन काढले. शेवटच्या टप्प्यात शिवम दुबेनं 12 बॉलमध्ये 2 सिक्सच्या मदतीनं 26 रन काढले.

मुंबईचं आव्हान केरळनं सहज पूर्ण केलं. सलग दुसऱ्या पराभवामुळे मुंबईची टीम अडचणीत सापडली आहे. मुंबईचा पहिल्या मॅचमध्ये दिल्लीने पराभव केला होता.

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 12:13 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading