पाकिस्तानला जाणं 'या' धोनीला पडलं महागात, झाली निलंबनाची कारवाई!

वर्ल्ड कपवेळी तंदुरुस्त असतानाही कर्णधार आणि संघाच्या व्यवस्थापकांनी अनफिट असल्याचं सांगून त्याला मायदेशी पाठवण्यात आलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2019 09:17 AM IST

पाकिस्तानला जाणं 'या' धोनीला पडलं महागात, झाली निलंबनाची कारवाई!

काबुल, 11 ऑगस्ट : अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजादवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर क्रिकेट मंडळाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे. बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकारत म्हटलं आहे की, शहजागनं देशातून बाहेर जाण्याच्या नियमांचं पालन केलं नाही. अफगाणिस्तान बोर्डाच्या समितीने त्याला 20 आणि 24 जुलैला बोलावलं होतं मात्र तो आला नाही. ही बैठक आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपशी संबंधीत शिस्तपालनाबाबत होती. मात्र शहजाद त्यासाठी उपस्थित झाला नाही. आता ही समिती ईदनंतर पुन्हा एकदा बैठक घेणार असून पुढच्या कारवाईचा विचार करणार आहे.

मोहम्मद शहजाद सध्या पाकिस्तानातील पेशावरमध्ये आहे. त्या ठिकाणी सराव करत आहे. गेल्या वर्षी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं त्याला इशारा दिला होता. अफगाणिस्तानात कायमस्वरूपी राहून तिथंच सराव करावा अन्यथा त्याचा करार रद्द करण्यात येईल. शहजादचं बालपण पेशावरमधील निर्वासितांच्या शिबिरामध्ये गेलं. मूळचा अफगाणिस्तानचा असलेला शहजाद नांगरहार परिसरात राहतो. अफगाणिस्तानचे अनेक क्रिकेटपटू पाक-अफगाण सीमेवर लहानाचे मोठे झाले आहेत. शहजादचं लग्न पेशावरमध्ये झालं आहे.

वर्ल्ड कप दरम्यान शहजादला अफगाणिस्तानला पाठवण्यात आलं होतं. त्याला गुडघ्याला दुखापत झाल्यानं परत पाठवल्याचं म्हटलं होतं. मात्र, हे फेटाळून लावत चुकीच्या पद्धतीने आपल्याला संघातून बाहेर काढल्याचा आरोप शहजादनं केला होता. तंदुरुस्त असतानाही कर्णधार आणि संघाच्या व्यवस्थापकांनी अनफिट असल्याचं सांगितल्याचाही आरोप केला होता.

शहजाद अफगाणिस्तानकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं 84 सामन्यात 2 हजार 727 धावा केल्या आहेत. शहजाद अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. फलंदाजी करताना सलामीवीर म्हणून जबाबदारी पार पाडतो. वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यात मात्र शहजाद अयशस्वी ठरला. भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा चाहता असल्याचं शहजाद म्हणतो. धोनीचा स्वभाव कूल आहे आणि आपण मात्र रागीट असून हाच दोघांमध्ये फरक आहे असंही शहजादनं सांगितलं आहे. फलंदाजीत तो धोनीची स्टाइल कॉपी करतो. तसेच स्वत:ला एमएस (मोहम्मह शहजाद) म्हणवून घेण्यास आवडतं असंही तो म्हणतो. अफगाणिस्तानमधील चाहते त्याला धोनी म्हणूनच हाक मारतात.

VIDEO: सांगली, कोल्हापुरातला पूर ओसरायला सुरूवात, पाहा रविवारी सकाळची परिस्थिती

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 11, 2019 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...