मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Year Ender 2021: T20 क्रिकेटला मिळाला नवा बॉस, वर्षभरात काढले 2000 रन

Year Ender 2021: T20 क्रिकेटला मिळाला नवा बॉस, वर्षभरात काढले 2000 रन

PAK vs WI T20 : टी20 क्रिकेटला (T20 Cricket) एक नवा स्टार या वर्षात (2021) मिळाला आहे. त्याने एकाच कॅलेंडर वर्षात 2 हजार पेक्षा जास्त रन काढले आहेत. ही कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 डिसेंबर : 2021 हे वर्ष आता संपत आले आहे. या वर्षात अनेक नव्या क्रिकेटपटूंचा उदय झाला. काही जण निवृत्त झाले. काहींनी क्रिकेट विश्व गाजवलं. तर काहींसाठी हे वर्ष निराशाजनक ठरले. टी20 क्रिकेटला एक नवा स्टार या वर्षात मिळाला आहे. त्याने एकाच कॅलेंडर वर्षात 2 हजार पेक्षा जास्त रन काढले आहेत. ही कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे.

पाकिस्तानचा ओपनिंग बॅटर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) असं या नव्या स्टारचं नाव आहे. त्याने गुरुवारी वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 इंटरनॅशनलमध्ये (Pakistan vs West Indies) 87 रनची आक्रमक खेळी केली. या खेळीच्या दरम्याम त्याने 2000 रनचा टप्पा पार केला. रिझवानने 2021 या वर्षात टी20 क्रिकेटमध्ये 2036 रन काढले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त रन बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बाबर आझम दुसऱ्या, ख्रिस गेल तिसऱ्या तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. बाबरने 2021 मध्ये 1779 रन केले आहेत. गेलनं 2015 साली 1665 तर विराटनं 2016 साली 1614 रन केले होते.

मोहम्मद रिझवाननं या वर्षी टी20 इंटरनॅशनलमधील 26 मॅचमध्ये 1326 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. 104 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर असून त्याने 135 च्या स्ट्राईक रेटनं हे रन काढले आहेत. या वर्षात टी20 इंटरनॅशनलमध्ये 100 फोर लगावणारा रिझवान हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

मोहम्मद रिझवान एकाच वर्षात टी20 इंटरनॅशनलमध्ये 1000 रन पूर्ण करणारा पहिला खेळाडू आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल या सारख्या दिग्गजांना आजवर ही कामगिरी करता आलेली नाही. विराटनं 2016 साली सर्वात जास्त 641 रन केले होते. गेलला अद्याप एकदाही 500 चा टप्पा ओलांडता आलेला नाही.

IND vs SA : टीम इंडियाला दिलासा, दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू घेणार माघार

रिझवानने त्याच्या एकूण टी20 कारकिर्दीत 138 इनिंगमध्ये 40 च्या सरासरीनं 4065 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. तसंच त्यानं 380 फोर आणि 105 सिक्स लगावले आहेत.

First published:

Tags: Cricket news, Pakistan, T20 cricket