मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

इम्रान खान यांच्या निर्णयाला पाकिस्तान क्रिकेटमधून विरोध, माजी कॅप्टननं केला मोठा आरोप

इम्रान खान यांच्या निर्णयाला पाकिस्तान क्रिकेटमधून विरोध, माजी कॅप्टननं केला मोठा आरोप

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना राजकीय विरोधक नवे नाहीत. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेटमध्येही त्यांचा विरोधक आता तयार झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 31 जानेवारी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना राजकीय विरोधक नवे नाहीत. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेटमध्येही त्यांचा विरोधक आता तयार झाला आहे. पाकिस्तानचा माजी कॅप्टन मोहम्मद हाफिजनं (Mohammad Hafeez) इम्रान खान यांच्या क्रिकेटमधील निर्णावर प्रश्न उपस्थित केला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक क्रिकेटपटू बेरोजगार झाले आहेत. त्यांना आता कोणतेही भविष्य नाही, असा दावा त्याने केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं 2 वर्षांपूर्वी इम्रान खान यांच्या निर्देशानुसार विभागीय आणि बँक टीमची भूमिका समाप्त केली होती. विशेष म्हणजे इम्रान स्वत: देशांतर्गत क्रिकेटमध्ये विमान कंपनी आणि अन्य विभागाकडून भरपूर क्रिकेट खेळले आहेत. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या हाफिजनं या निर्णयाला विरोध केला आहे. त्याचबरोबर त्याने पीसीबी अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. हाफिजनं जियो न्यूजशी बोलताना सांगितले की, 'पीसीबी अध्यपदासाठी निष्पक्ष निवडणूक व्हायला हवी. अध्यक्षाची नियुक्ती बोर्डाचे मुख्य संरक्षक म्हणजेच पंतप्रधानांनी करू नये. अध्यक्ष निवडीची सध्याची प्रक्रिया योग्य नाही. पीसीबी अध्यक्ष हा राजकीय सोयीच्या आधारावर नियुक्त केला जातो. ज्या अध्यक्षाची निवड राजकीय कारणांमुळे होते, त्याला क्रिकेट अजिबात समजत नाही.' बाबर आझम सलग तिसऱ्या मॅचमध्ये फेल, 20 वर्षांच्या मुलापेक्षाही खराब खेळ पाकिस्तान क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन रमीझ राजा हे सध्या पीसीबीचे अध्यक्ष आहेत. इम्रान खान यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. हाफिजनं पाकिस्तानकडून 55 टेस्ट, 218 वन-डे आणि 119 टी20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. मागच्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये हाफिज खेळला होता. तब्बल 18 वर्षांच्या कारकिर्दीनंतर वयाच्या 41 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्री क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) लाहोर कलंदर टीमचा सदस्य आहे.
First published:

Tags: Cricket news, Imran khan, Pakistan Cricket Board

पुढील बातम्या