Home /News /sport /

IND vs PAK : 9 महिने आधीच पाकिस्तानी खेळाडू वाकड्यात शिरला, टीम इंडियाला डिवचत म्हणाला...

IND vs PAK : 9 महिने आधीच पाकिस्तानी खेळाडू वाकड्यात शिरला, टीम इंडियाला डिवचत म्हणाला...

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही टीम एकाच गटात आहेत.

    मुंबई, 23 जानेवारी : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही टीम एकाच गटात आहेत. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये दोन्ही टीममधील ऐतिहासिक मॅच होणार आहे. या मॅचला अद्याप 9 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.  क्रिकेट फॅन्सना मोठी उत्सुकता असलेल्या या मॅचबाबत आत्तापासून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी बोलण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तान टीममधील माजी ऑल राऊंडर मोहम्मद हाफिजनं (Mohammad Hafeez) जानेवारी महिन्यातच पाकिस्तान टीमच्या विजयाचे दावे करण्यास सुरूवात केली आहे. 'सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानची टीम ही टीम इंडियापेक्षा पुढे आहे. माझ्या मते विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांनी मोठा स्कोर केला नाही, तर अन्य भारतीय खेळाडूंना मोठ्या मॅचचं प्रेशर सहन करता येणार नाही, ' असा दावा  हाफीजनं केला आहे.मी अन्य भारतीय खेळाडूंना कमी लेखत नाही, असेही हाफिजने स्पष्ट केले. तो 'स्पोर्ट्स तक' शी बोलत होता. मोहम्मद हाफीजनं काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यूएईमध्ये मागच्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला होता. त्या पाकिस्तानी टीमचा हाफीज सदस्य होता. कोणत्याही वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील पाकिस्तानचा हा पहिलाच विजय आहे. टीम इंडियाला या पराभवाचा वचपा काढण्याची संधी 23 ऑक्टोबर रोजी आहे. Legends League Cricket : धोनीच्या मित्राने केला चमत्कार, फक्त 19 बॉलमध्येच फिरवली मॅच वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक भारत विरुद्ध पाकिस्तान – 23 ऑक्टोबर, मेलबर्न भारत विरुद्ध ग्रुप A उपविजेता - 27 ऑक्टोबर, सिडनी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 30 ऑक्टोबर, पर्थ भारत विरुद्ध बांगलादेश -  2 नोव्हेंबर, अ‍ॅडलेड भारत विरुद्ध ग्रुप B विजेता - 6 नोव्हेंबर, मेलबर्न पहिली सेमी फायनल - 9 नोव्हेंबर, सिडनी दुसरी सेमी फायनल - 10 नोव्हेंबर, अ‍ॅडलेड फायनल - 13 नोव्हेंबर, मेलबर्न
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, Pakistan, Team india

    पुढील बातम्या