मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जेलमध्ये प्रेम, वकिलासोबत लग्न, पाकिस्तानी क्रिकेटपटू झाला तिसऱ्यांदा बाबा!

जेलमध्ये प्रेम, वकिलासोबत लग्न, पाकिस्तानी क्रिकेटपटू झाला तिसऱ्यांदा बाबा!

पाकिस्तानी क्रिकेटपटू जेलमध्ये असताना ती त्याची वकील होती. तिथंच दोघांचं प्रेम झालं आणि वर्षभरानी त्यांनी लग्न केलं.

पाकिस्तानी क्रिकेटपटू जेलमध्ये असताना ती त्याची वकील होती. तिथंच दोघांचं प्रेम झालं आणि वर्षभरानी त्यांनी लग्न केलं.

पाकिस्तानी क्रिकेटपटू जेलमध्ये असताना ती त्याची वकील होती. तिथंच दोघांचं प्रेम झालं आणि वर्षभरानी त्यांनी लग्न केलं.

मुंबई, 22 सप्टेंबर :  पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी फास्ट बॉलर मोहम्मद आमीरने  त्याच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आमीर बुधवारी तिसऱ्यांदा बाप बनला. त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आमिरने सोशल मीडियावर  ही गोड बातमी दिलीय. तसंच त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर नवजात बाळाचा फोटो शेअर केलाय. यानंतर आमीर आणि त्याच्या पत्नीचं अनेकांनी अभिनंदन केलं. मोहम्मद आमीरने 2016 मध्ये नरजीस खातून (Narjis Khatun) हिच्यासोबत लव्ह मॅरेज केलं. त्यांची ही तिसरी मुलगी आहे.  मोठ्या मुलीचे नाव मिन्सा आमीर (Minsa Amir) तर दोन नंबरच्या मुलीचं नाव झोया आमीर (Zoya Amir) आहे. आता त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलीचं नाव आयरा आमीर ठेवलंय. आमीरची पत्नी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, आणि ती वेळोवेळी पती आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करते. नरजीस खातून पाकिस्तानी वंशाची असून लंडनमध्ये राहते. सध्या आमीरही मुलं आणि पत्नीसह लंडनमध्ये राहतो. त्याने नुकतंच सांगितलं होतं की, ‘त्याला आता कुटुंबासह इंग्लंडमध्ये राहायचं आहे, आणि त्याच्या मुलांचं शिक्षणही तिथेच करायचं आहे.’ सिनेमासारखी लव्हस्टोरी मोहम्मद आमीर आणि त्याची पत्नी नरजीस खातून यांची लव्हस्टोरी ही एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. आमीर हा 2010 साली स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. तेव्हा त्याला 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. यावेळी नरजीस खातून ही वकील म्हणून काम करत होती. आमीर जेव्हा स्पॉट फिक्सिंग प्रकरणात तुरुंगात होता, तेव्हा नरजीस खातून त्याची केस लढत होती. यादरम्यान दोघंही प्रेमात पडले. सहा वर्षांनंतर दोघांचं लग्न झालं. लग्नाच्या एका वर्षानंतर म्हणजेच 2017 मध्ये नरजीसने पहिल्या मुलीला जन्म दिला. नागपुरातील मॅचवर पावसाचं सावट, एकही बॉल पडला नाही तर VCA ला मिळणार 5 कोटी! क्रिकेटमधील कामगिरी वयाच्या 28 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा मोहम्मद आमीर जगभरातील टी- 20 लीगमध्ये खेळतो. आमीरच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने पाकिस्तानकडून 36 टेस्ट मॅच खेळल्या असून, त्यामध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत. तर 61 वन-डे मॅच खेळल्या असून, त्यात 81 बळी घेतलेत. याशिवाय 50 टी-20 मॅचमध्ये 59 विकेट घेतल्या आहेत. सध्या आमीर हा त्याच्या कुटुंबासमवेत लंडनमध्ये असून, घरामध्ये नवीन सदस्य आल्याने तो एकदम आनंदी असल्याचं त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसतंय.
First published:

Tags: Cricket news, Pakistan

पुढील बातम्या