Home /News /sport /

विराटनंतर 'या' इंग्लंडच्या क्रिकेटपटूला RCB चा कॅप्टन करा, मायकल वॉनची सूचना

विराटनंतर 'या' इंग्लंडच्या क्रिकेटपटूला RCB चा कॅप्टन करा, मायकल वॉनची सूचना

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं (Royal Challengers Bangalore) या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येताच विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीचा देखील शेवट झाला आहे. विराटनंतर आरसीबीचा पुढील कॅप्टन (RCB New Captain) कोण होणार? याची आता उत्सुकता आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 ऑक्टोबर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं (Royal Challengers Bangalore) या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येताच विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीचा देखील शेवट झाला आहे. विराटनंतर आरसीबीचा पुढील कॅप्टन (RCB New Captain) कोण होणार? याची आता उत्सुकता आहे. आरसीबीला नवा कॅप्टन निवडणं हे तितकं सोपं नसेल, कारण नव्या खेळाडूकडं टीमची जबाबदारी घेण्याबरोबरच विराट कोहलीसारख्या खेळाडूचं नेतृत्त्व करण्याचीही क्षमता हवी, असं मत इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) याने व्यक्त केलं आहे. वॉननं क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, 'आरसीबीमध्ये विराटचा कॅप्टन होणाऱ्या खेळाडूला त्याचा खेळ नीट माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याला टी20 क्रिकेटमधील बारकावे देखील माहिती हवेत आणि खेळाडूंना सांभाळण्याची क्षमता त्याच्यात हवी. विशेषत: विराट कोहलीसारखा खेळाडू. त्यानं आता कॅप्टनसी सोडली असून टीममध्ये तो आता एक सिनिअर खेळाडू म्हणून असेल. आरसीबीचा कॅप्टन म्हणून मी ज्या खेळाडूचं नाव सूचवणार आहे, ते ऐकूण तुम्हाला धक्का बसेल. कारण तो सध्या दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळतो. तसंच कदाचित 2022 च्या मेगा ऑक्शपूर्वी त्याला त्याची फ्रँचायझी रिटेन करेल. पण, जोस बटलरनं (Jos Butler) आरसीबीचा कॅप्टन व्हावं. त्याच्यात हे सर्व गूण आहेत. जे त्याला महेंद्रसिंह धोनीसारखा (MS Dhoni) कॅप्टन बनवतील. माझ्या मनात याबाबत कोणतीही शंका नाही. IPL 2021: 'काही जणांना आता छान झोप लागेल', विराटनं कॅप्टनसी सोडताच डिविलियर्सचं वक्तव्य VIDEO बटलर इयन मॉर्गनच्या कॅप्टनसीमध्ये बराच काळ खेळला आहे. तो हुशार क्रिकेटपटू आहे. राजस्थान रॉयल्सची त्याच्याबाबत काय योजना आहे, हे मला माहिती नाही. मी आरसीबीच्या टीम मॅनेजमेंटमध्ये असतो तर नक्की बटलरला टीममध्ये घेऊन त्याला कॅप्टन केलं असंत,' असं वॉननं यावेळी सांगितलं. IPL 2021, KKR vs DC: कोलकाताविरुद्धच्या मॅचपूर्वी दिल्लीच्या कोचनं टीमला दिला इशारा बटलर सध्या राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये आहे. त्यानं कौटुंबिक कारणामुळे आयपीएल स्पर्धेच्या फेज 2 मध्ये भाग घेतला नव्हता. पुढील वर्षी मेगा ऑक्शनपूर्वी राजस्थाननं बटलरला रिलीज केलं तर त्याला खरेदी करण्याची बंगळुरूला संधी असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या