या बॅटने खेळायला परवानगी नाही, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या MCC ने दिलं स्पष्टीकरण

या बॅटने खेळायला परवानगी नाही, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या MCC ने दिलं स्पष्टीकरण

टी-20 क्रिकेट (T20 Cricket) आणि फिल्डिंगच्या नियमांमुळे क्रिकेट हा बॅट्समनचाच खेळ होत असल्याचा आरोप क्रिकेटपटूंसह चाहतेही वारंवार करत असतात, पण आता क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या एमसीसी या संस्थेने बॉलर्सना दिलासा दिला आहे. एमएसीसीने बांबूपासून बॅट (Bamboo Bat) बनवण्याच्या कल्पनेला केराची टोपली दाखवली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे : टी-20 क्रिकेट (T20 Cricket) आणि फिल्डिंगच्या नियमांमुळे क्रिकेट हा बॅट्समनचाच खेळ होत असल्याचा आरोप क्रिकेटपटूंसह चाहतेही वारंवार करत असतात, पण आता क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या एमसीसी या संस्थेने बॉलर्सना दिलासा दिला आहे. एमएसीसीने बांबूपासून बॅट (Bamboo Bat) बनवण्याच्या कल्पनेला केराची टोपली दाखवली आहे. तसंच खेळाला आणखी टिकाऊ करण्यासाठी इंग्लिश विलोच्या उपयोगावर विचार व्हावा, असं मतही एमसीसीने मांडलं आहे. बांबूची बॅट वापरायची असेल, तर सध्याच्या नियमांमध्ये बदल करावे लागतील, असंही एमएसीसीकडून सांगण्यात आलं आहे.

बांबूपासून बनवलेली बॅट लाकडी बॅटला चांगी स्पर्धा देऊ शकते, तसंच लाकडी बॅटपेक्षा बांबूच्या बॅटचा स्वीट स्पॉट आणखी चांगला आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे. स्वीट स्पॉट म्हणजे बॅटच्या ठिकाणी बॉल लागून वेगाने जातो, यामुळे खेळाडूला मोठे शॉट मारायला सोपं जाईल, तसंच यॉर्कर बॉलवरही बॅट्समन सहज फोर मारू शकेल. हे संशोधन कॅम्ब्रिज विद्यापीठाचे डॉ. दर्शील शाह आणि बेन टिंकलर यांनी केलं आहे. या संशोधनानुसार लाकडी बॅटपेक्षा बांबीची बॅट 22 टक्के जास्त टणक आहे. या बॅटमुळे यॉर्करवर फोर मारणं सोपं होईल, असं कॅम्ब्रिज सेंटर फॉर नॅचरल मटेरियल इनोव्हेशनचे डॉ. दर्शील शाह म्हणाले.

'नियम 5.3.2 नुसार बॅटही पूर्णपणे लाकडापासून बनवली गेली पाहिजे, पण बांबू गवताचा प्रकार आहे, त्यामुळे बांबूची बॅट वापरण्यासाठी नियमामध्ये बदल करावा लागेल. पण एमसीसी बॅट आणखी शक्तीशाली होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे, म्हणूनच 2008 आणि 2017 साली बॅट तयार करण्यासाठीची सामग्री आणि याच्या आकाराच्या नियमाबाबत नवे नियम करण्यात आले. या नियमानुसार बॅटची लांबी 38 इंचापेक्षा आणि रुंदी 4.25 इंचापेक्षा जास्त ठेवता येणार नाही, तसंच बॅटचं वजनही 2 ते 3 पाऊंड असावं,' असं एमसीसीने सांगितलं.

Published by: Shreyas
First published: May 11, 2021, 11:08 PM IST
Tags: cricketicc

ताज्या बातम्या