मुंबई, 20 मे : सर्वात जास्त वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेचं (Ranji Cricket Trophy) विजेपद पटकावणाऱ्या मुंबई क्रिकेट टीमला नव्या मुख्य प्रशिक्षकाची Head Coach) गरज आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) मुख्य प्रशिक्षकासह (अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुंबईची विद्यमान प्रशिक्षक रमेश पोवर (Ramesh Powar) यांची राष्ट्रीय महिला टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Indian Women Team) निवड झाल्यानं ही जागा रिक्त झाली आहे.
'या' अटींची पूर्तता आवश्यक
मुंबई क्रिकेट असोसिएशननं अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 24 मे असल्याचं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर नव्या प्रशिक्षकासाठी असलेला निकष देखील जाहीर केला आहे. या निकषानुसार अर्ज करणाऱ्या व्यक्तीने किमान 50 प्रथम श्रेणी सामने खेळणे आवश्यक आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) प्रमाणित केलेला कोच असावा. त्याच्याकडे कोणत्याही राज्य किंवा आयपीएल फ्रँचाझिच्या कोचिंगचा अनुभव हवा, तसेच त्याचे निवासस्थान मुंबईमध्ये असणे आवश्यक आहे.
'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन, दोन भावांच्या जोडीला मिळणार संधी!
या क्रिकेट सत्राच्या सुरुवातीला अमित पागनिस यांची मुंबईच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुश्ताक अली T20 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर त्यांनी राजीनामा दिला. रमेश पोवारच्या नेतृत्त्वाखाली मुंबईनं विजय हजारे ट्रॉफीचे विजतेपद पटावले. मात्र त्यांना राष्ट्रीय टीमची जबाबदारी मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.