News18 Lokmat

पहिल्या विकेटसाठी मयंक- हनुमाने केल्या ४० धावा, ऑस्ट्रेलियामध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली जोडी

भारतासाठी हनुमा विहारी आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंक अग्रवालने सलामीवीर जोडीची जबाबदारी सांभाळली.

News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2018 10:10 AM IST

पहिल्या विकेटसाठी मयंक- हनुमाने केल्या ४० धावा, ऑस्ट्रेलियामध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली जोडी

मेलबर्न, २६ डिसेंबर २०१८- बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतासाठी हनुमा विहारी आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंक अग्रवालने सलामीवीर जोडीची जबाबदारी सांभाळली. सलामीवीर जोडी म्हणून दोघांचा हा पहिलाच सामना होता. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असं करणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. मयंक आणि विहारीने भारताला ४० धावांची चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र पॅट कमिन्सने हनुमा विहारीला (८) एरॉन फिंचकरवी झेल बाद केले.

मयंक आणि हनुमाच्याआधी परदेशात पहिल्यांदा सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याचं श्रेय जनार्धन नाविल आणि एन. जाओमल यांना जाते. या दोघांनी १९३२ मध्ये लॉर्ड्समध्ये भारतीय डावाची सुरुवात केली होती. भारताचा तो पहिला कसोटी सामनाही होता. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावा केल्या होत्या. यानंतर १९३६ मध्ये पुन्हा एकदा अशी संधी भारताच्या वाट्याला आली. यावेळी विजय मर्चेंट आणि दत्ताराम हिंदळेकर यांनी डावाची सुरुवात केली होती. मर्चेंट आणि हिंदळेकर यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली.
मेलबर्नमध्ये मयंक आणि विहारीने पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. विहारीने २५ चेंडू आणि ३३ मिनिटांचा वेळ मैदानात घालवल्यानंतर पहिली धाव घेतली. तर ६६ चेंडूत अवघ्या ८ धावा करुन हनुमा बाद झाला. मेलबर्नमध्ये या जोडीने १८.५ षटकांपर्यंत फलंदाजी केली. जुलै २०११ नंतर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्युझीलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय सलामीवीरांचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...