लंडन, 10 मे : क्रिकेटच्या मैदानावर काहीही होऊ शकतं. यात काही वेळा अनेक विनोदी प्रसंग घडतात. इंग्लंडमध्ये एका देशांतर्गत सामन्यात क्रिकेटपटूने धाव घेताना जे झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
इंग्लंडमध्ये समरसेट काउंटी क्रिकेट क्लबच्या सामन्यात स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजाने चेंडू मारला. त्यावेळी धाव घेताना ट्रेस्कोथिक क्रीजवर पोहोचला आणि पाय घसरून पडला. त्यावेळी पुन्हा उठून दुसरी धाव घेतली. तिथून मागे फिरताना पुन्हा पडला. यावेळी दुसरा फलंदाज तिसऱी धाव घेण्यासाठी पळाला मात्र, ट्रेस्कोथिक जमिनीवर पडल्याने पळाला नाही.
That's not what captains normally mean when they ask for 'two slips' 😂 pic.twitter.com/2QhgpvFs7A
— ICC (@ICC) May 10, 2019
आयसीसीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर कॅप्शन देताना म्हटले आहे की, कर्णधार दोन स्लीपची मागणी करतो याचा अर्थ दोनवेळा पडा असं नाही. हा व्हिडिओ मायकल वॉननेसुद्धा शेअऱ केला आहे. त्याने म्हटले ट्रेस्कोथिकची धावण्याची ही कला यावर्षी तरी सुधरणार नाही.
वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत
वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य
वाचा- CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन
VIDEO: ...तर अरविंद केजरीवाल राजकारण सोडणार का? गौतम 'गंभीर' आव्हान