Home /News /sport /

टीम इंडियाच्या फास्ट बॉलरला कोरोनाची लागण, 'आयपीएल'मधून बाहेर

टीम इंडियाच्या फास्ट बॉलरला कोरोनाची लागण, 'आयपीएल'मधून बाहेर

कोरोना व्हायरस (Corona Virus)ने आता भारतीय क्रिकेटमध्येही शिरकाव केला आहे. भारतीय महिला टीमची फास्ट बॉलर मानसी जोशी (Mansi Joshi)चा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस (Corona Virus)ने आता भारतीय क्रिकेटमध्येही शिरकाव केला आहे. भारतीय महिला टीमची फास्ट बॉलर मानसी जोशी (Mansi Joshi)चा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मानसी जोशी पुढच्या महिन्यात युएईमध्ये होणाऱ्या महिला टी-20 चॅलेंजरमध्ये खेळणार नाही. बीसीसीआय (BCCI)ने काहीच दिवसांपूर्वी महिला आयपीएलच्या तीन टीमची घोषणा केली होती. महिला आयपीएलमध्ये मिताली राज, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर व्हेलॉसिटी, ट्रायब्लर्स आणि सुपरनोवासच्या टीमचं नेतृत्व करणार आहेत. 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महिला आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार 27 वर्षांच्या मानसीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मानसी सध्या देहरादूनमध्ये क्वारंटाईन आहे, त्यामुळे ती मुंबईला गेलेली नाही. महिला आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी भारतीय खेळाडू 13 ऑक्टोबरलाच मुंबईमध्ये पोहोचल्या आहेत. मानसी जोशीऐवजी मिताली राजच्या व्हेलॉसिटी टीममध्ये 26 वर्षांची फास्ट बॉलर मेघना सिंगला घेण्यात आलं आहे. मानसीने 2016 साली पदार्पण केल्यानंतर 11 वनडे आणि 8 टी-20 मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. 27 साल की मानसी जोशी कोरोना वायरस जांच में पॉजिटिव आने के बाद देहरादून में क्वारंटीन पर हैं. महिला आयपीएलमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, न्यूझीलंडच्या महिला खेळाडूही सहभागी होणार आहेत. थायलंडची क्रिकेटपटू नाथ्थाकन चानथामही यंदाच्या मोसमात खेळताना दिसेल. चानाथामने महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये थायलंडकडून पहिलं अर्धशतक केलं होतं. ही स्पर्धा खेळणारी चानथाम थायलंडची पहिली क्रिकेटपटू असेल. भारतीय महिला निवड समितीने या तिन्ही टीमची निवड केली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 4 मॅच खेळवल्या जाणार आहेत. यातल्या 3 मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता, तर एक मॅच दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. स्पर्धेची पहिली मॅच 4 नोव्हेंबरला सुपरनोवास आणि व्हेलॉसिटी यांच्यात होईल, तर दुसरी मॅच 5 नोव्हेंबरला व्हेलॉसिटी आणि ट्रायब्लर्स यांच्यात असेल. सुपरनोवास टीम हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, चमारी अट्टापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटीया, शशिकला सिरिवर्दने, पूनम यादव, शकेरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, अयाबोंगा खाका, मुस्कान मलिक ट्रायब्लर्स टीम स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, ऋचा घोष, हेमलता, नुजहत परवीन, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झूलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमी खातून, सोफी, चानथाम, डिएंड्रा डॉटिन, केशवी गौतम व्हेलॉसिटी टीम मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, शेफाली वर्मा, सुषमा वर्मा, एकता बिष्ट, मेघना सिंग, शिखा पांडे, देविका विद्या, सुश्री दिबयादर्शनी, मनाली दक्षिणी, केसपेरेक, डेनियल व्याट, सुन लुस, जहांआरा आलम, एम अनागा
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या