मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Mankading प्रकरणात भारताच्या महान खेळाडूची बदनामी का केली जाते? वाचा सविस्तर

Mankading प्रकरणात भारताच्या महान खेळाडूची बदनामी का केली जाते? वाचा सविस्तर

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये भारताच्या दीप्ती शर्माने डीनला रनआउट केल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात वादाला सुरुवात झाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये भारताच्या दीप्ती शर्माने डीनला रनआउट केल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात वादाला सुरुवात झाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये भारताच्या दीप्ती शर्माने डीनला रनआउट केल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात वादाला सुरुवात झाली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये भारताच्या दीप्ती शर्माने डीनला रनआउट केल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात वादाला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारे रनआउट करणं हे खेळ भावनेच्या विरोधात असल्याचा इंग्लिश खेळाडूंचा दावा आहे. तसंच, याला मांकडिंग (Mankding) म्हटलं जात आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, मांकडिंग म्हणजे काय? अशा घटनेसोबत कोणत्या भारतीय खेळाडूचं नाव जोडलं गेलंय?

भारतीय क्रिकेटपटू मुलवंतराय हिम्मतलाल मंकड म्हणजे विनू मंकड यांचे नाव या प्रकरणाशी जोजण्यात आले आहे. विनू मंकड यांच्या नावावर लॉर्ड्सवरील एकाच टेस्ट मॅचमध्ये शतक आणि पाच विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. मंकड आणि पंकज रॉय यांनी टेस्ट मॅचमध्ये 413 रनांची विश्वविक्रमी भागीदारी केली होती. पाच दशकांहून अधिक काळ हा विक्रम त्यांच्या नावावर होता.

जानेवारी 1956 मध्ये मद्रास येथे न्यूझीलंड विरुद्ध 231 रन मंकड यांनी काढले होते. हा एखाद्या भारतीय क्रिकेटपटूचा जवळपास तीन दशके अबाधित राहिलेला टेस्ट मॅचमधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर होता. 1983 मध्ये सुनील गावस्करने हे रेकॉर्ड मोडलं. त्यांनी 44 टेस्टमध्ये 2109 रन केले तसंच 162 विकेट्सही घेतल्या होत्या.

मंकड यांचा संबंध काय?

विनू मंकड हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले क्रिकेट सुपरस्टार होते, पण गेल्या 75 वर्षांपासून जेव्हाजेव्हा नॉन स्ट्राइकवरील बॅट्समन बॉल पडण्याच्या अगोदर क्रीज सोडून रन चोरण्याचा प्रयत्नात बॉलरकडून रनआऊट झाल्यानंतर मंकड यांचे नाव चर्चेत येतं. कारण 1947-48 मध्ये ऑस्ट्रेलियात भारताच्या पहिल्या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन बिल ब्राउनला मंकड यांनी याच पद्धतीने बाद केलं होतं.

त्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ही इम्पिरिअल क्रिकेट परिषद म्हणून ओळखली जात होती. आयसीसीमधील 'इम्पिरियल' हे नावच ही गोष्ट सांगते. कॉमनवेल्थ देशांशी संबंधित एक खेळ, ज्याचे नियम लॉर्ड्स येथील मेरीलेबोन क्रिकेट क्लब च्या कॉन्फरन्स रूममध्ये सूट-बूटातील अधिकाऱ्यांकडून तयार केले गेले. ज्या ठिकाणी अस्पष्टपणे 'स्पोर्ट्समनशिप' हा शब्द जन्माला आला.

नियम बदलला तरी त्याच नियमावरुन पुन्हा राडा... भारताच्या विजयानंतर नवी कॉन्ट्रोवर्सी

काय आहे इतिहास?

1947-48 च्या दरम्यान 12 ते 18 डिसेंबर या काळात खेळल्या गेलेल्या सिडनी टेस्ट मॅचमध्ये मंकड यांनी ऑस्ट्रेलियन बॅट्समन ब्राउनला 18 धावांवर रनआउट केलं होतं. ही घटना खेळाच्या दुसऱ्या दिवशी (13 डिसेंबर) घडली. ही टेस्ट मॅच ड्रा झाली. या टेस्ट मॅचपूर्वी भारतीय टीमने 'ऑस्ट्रेलियन इलेव्हन' विरुद्ध त्याच मैदानावर सराव मॅच खेळली होती, हे फार कमी लोकांना माहीत असेल. खक गुलू इझेकील यांच्या 'मिथ बस्टिंग - इंडियन क्रिकेट बिहाइंड द हेडलाइन्स' या पुस्तकात या मॅचमध्ये ब्राउनला केलेल्या रनआउटच्या घटनेचा उल्लेख आहे. ब्राउनची अशा पद्धतीने रन चोरण्याचा प्रयत्न करण्याची ही दुसरी वेळ होती. ऑस्ट्रेलियन फर्स्ट क्लास क्रिकेटपटू आणि पत्रकार गिन्टी लुश यांनी द टेलिग्राफसाठी लिहिलेल्या लेखात याचा उल्लेख आहे. 14 डिसेंबर 1947 रोजीही 'संडे टेलिग्राफ'मधील लुशच्या लेखाचे शीर्षक होते 'मंकड यांनी बिल ब्राऊनला पुन्हा आउट केलं’.

टेलिग्राफच्या लेखात नेमकं काय होतं?

"ब्राउनच्या आउट होण्यामुळे मेंबर्स स्टँडमध्ये जोरदार चर्चा झाली. प्रेस बॉक्समध्येही चर्चा झाली की, मंकड यांनी खेळभावनेचे उल्लंघन केलंय. पण ब्राउन-मंकड द्वंद्वयुद्धाचा इतिहास असा आहे की, एससीजीमधील भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया टीम मॅचमध्ये ब्राऊनला मंकड यांना बॉल पडण्याच्या अगोदर क्रीज सोडून रन चोरण्याचा प्रयत्न केल्यामुळे इशारा दिला होता. त्यानंतर टेस्ट मॅचमध्ये मंकडने ब्राऊनला रनआउट केलं. टेलिग्राफच्या बातमीत लिहिलं होतं की, ब्राउन "मूर्ख" होता, ज्याने रन चोरण्याचा प्रयत्न केला.

संडे टेलिग्राफमधील रिपोर्टनंतर एका आठवड्यानंतर, ट्रुथ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार आपण ब्राऊन यांना इशारा दिला नव्हता असं मंकड यांनी कबूल केल्याचा दावा केला होता. पण त्यांनी आर्थर मॉरिसला त्याच्या जोडीदार बॅट्समनला सावध करताना ऐकलं होतं.

अखेर रन आऊटच्या 'त्या' निर्णयावर MCC कडून स्पष्टीकरण, बॅट्समनना दिला थेट इशारा

म्हणून बॉलरची एकाग्रता होते भंग

एलएच कीर्नी यांनी 19 डिसेंबर 1947 रोजी 'कुरियर मेल' मधील त्यांच्या लेखात याबाबत माहिती दिली आहे. कीर्नीने लिहिले आहे की, "अलीकडेच ब्रिस्बेनमध्ये, विनूने मला अशा पद्धतीने आउट कसं केलं होतं, याचं कारण तो जोपर्यंत ब्राऊनला दुसऱ्यांदा आउट करत नाही, तोपर्यंत सांगणार नाही. त्यांनी पुढे लिहिलं की, "मंकडने माझ्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की डाव्याखुरा बॉलर असल्याने, जेव्हा ब्राऊन बॉल पडण्याच्या अगोदर क्रीज सोडतो तेव्हा तो बॉलरचं लक्ष विचलित करतो. कारण जेव्हा मंकड बॉल टाकणार असतात, तेव्हाच त्याची दृष्टी क्रीस सोडणाऱ्या बॅट्समनकडे जाते. मंकड यांनी सांगितलं होतं, ‘माझ्या नजरेवर परिणाम होतो, आणि माझ्या बॉलिंगची एकाग्रता भंग होते. मी सिडनीमध्ये सराव मॅचमध्ये ब्राऊनला बॉल माझ्या हातातून सुटेपर्यंत क्रीज सोडू नको, असं सांगितलं होतं. पण ब्राऊनने त्याकडे दुर्लक्ष केलं.’

कीर्नी यांनी त्यांच्या लेखात म्हंटल होतं की, ‘मंकड यांनी स्पष्ट केलं की, उजव्या हाताच्या बॉलरला बॉलिंग करताना नॉन स्ट्राइकला असलेल्या बॅट्समनच्या हालचालीचा फारसा फरक पडत नाही. कारण जेव्हा बॉल उजव्या हाताच्या बॉलरच्या हातातून सुटतो, तेव्हा तो नॉन स्ट्राइकचा बॅट्समन हा रन चोरण्यासाठी क्रीज अगोदरच सोडत असल्याचं पाहू शकत नाही. तर, काहीजणांच्या मते मंकड यांनी ज्या पद्धतीने बॅट्समनला रनआउट केलं होतं, ते क्रिकेट नव्हतं. ते हास्यास्पद आहे. पण अनेकांच्या मते बॉल पडण्याअगोदर क्रीज सोडणं अयोग्य आहे. त्यामुळेच विनू मंकड यांनी 13 डिसेंबर 1947 ला जसा रन आउट केला, तसाच रनआउट 24 सप्टेंबर 2022 रोजी दीप्ती शर्मा यांनी केला. हा रनआउट नियमानुसार योग्य आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england