Home /News /sport /

चुकीला माफी नाही! आता बिनधास्त होणार Mankading, क्रिकेटच्या नियमांत मोठे बदल

चुकीला माफी नाही! आता बिनधास्त होणार Mankading, क्रिकेटच्या नियमांत मोठे बदल

क्रिकेटमध्ये बॅटर्सना फायदा देणारी ही प्रथा आता कायमची बंद होणार आहे. मेलबर्न क्रिकेट क्लब (Marylebone Cricket Club) या क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेनं नवे नियम तयार केले आहेत.

    मुंबई, 9 मार्च : क्रिकेट खेळताना बॉल टाकण्यापूर्वीच अनेकदा नॉन स्ट्रायकरवरील बॅटरनं क्रिझ सोडलेलं असतं. अशा बॅटरना रन आऊट (Mankading) करणे हे खेळ भावनेच्या विरोधात आहे, असा अनेकांचा आक्षेप आहे. आयपीएल 2019 मध्ये तेव्हा पंजाबच्या टीमकडून खेळणारा टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) या पद्धतीनं जोस बटलरला आऊट केलं होतं, त्यावेळी मोठा वाद झाला होता. क्रिकेटमध्ये बॅटर्सना फायदा देणारी ही प्रथा आता कायमची बंद होणार आहे. मेलबर्न क्रिकेट क्लब (Melbourne Cricket Club) या क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेनं नवे नियम तयार केले आहेत. या नियमामुसार एखाद्या बॅटरला मंकडिंग पद्धतीनं आऊट करणे हे खेळ भावनेच्या विरोधात मानले जाणार नाही.  1 ऑक्टोबर 2022 पासून या नियमांची अमंलबजावणी होणार आहे. त्यामुळे नॉन स्ट्रायकरला आता बॉल टाकण्यापूर्वीच क्रिझ सोडताना हजारवेळा विचार करावा लागेल. नवा खेळाडू घेणार स्ट्राईक एमसीसीनं नियम क्रमांक 18.11 मध्येही बदल केला आहे. या बदलानुसार कोणताही बॅटर कॅच आऊट झाला तर नवीन बॅटर पुढील बॉल खेळण्यासाठी स्ट्राईकवर येईल. कॅच घेण्यापूर्वी दोन्ही बॅटरन रन काढताना स्ट्राईक बदलली असली तरी  काही फरक पडणार नाही. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बॅटर कॅच आऊट झाल्यास मात्र हा नियम लागू होणार नाही. यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ECB) 'द हंड्रेड' लीगमध्ये या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली होती. ENG vs WI : बॉल सोडला आणि दांडी उडाली, इंग्लंडचा कॅप्टन पाहातच राहिला! VIDEO लाळ लावण्यास बंदी बॉलला लाळ किंवा घाम लावण्यासाठी देखील एमसीसीनं बंदी घातली आहे. यापूर्वी कोरोना काळात खबरदारी म्हणून हा नियम लागू करण्यात आला होता. आता एमसीसीनं त्याला कायमस्वरूपी मान्यता दिली आहे. या प्रकारानं खेळात बदल करण्याचा जबरदस्तीनं प्रयत्न केला जातो, असं एमसीसीचं मत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Icc

    पुढील बातम्या