पंत-शंकरची जागा कोणी घ्यायला हवी? मांजरेकरांनी सुचवला पर्याय

पंत-शंकरची जागा कोणी घ्यायला हवी? मांजरेकरांनी सुचवला पर्याय

भारताने चौथ्या-पाचव्या क्रमांकावर अनेक प्रयोग केले तरी सक्षम पर्याय सापडला नाही. यामुळे दिवसेंदिवस मधल्या फळीची डोकेदुखी वाढत चालली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेवेळी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आलेल्या मांजरेकरांना आता मोठं विधान केलं आहे. मांजरेकरांनी भारताच्या मधल्या फळीतील प्रश्न सोडवण्यासाठी उपाय सुचवला आहे. मांजरेकरांनी ट्वीट करत सांगितलं की, भारताला चौथ्या-पाचव्या क्रमांकावर विराट कोहली सारख्या फलंदाजीची गरज आहे.

मांजरेकरांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे की, भारताला एक असा फलंदाज हवा जो 80 ते 90 च्या स्ट्राइक रेटनं धावा करेल. तसेच कोणतीही जोखीम न पत्करता धावगती कायम राखेल असा फलंदाज पाहिजे.

सध्या भारताकडे मांजरेकरांच्या म्हणण्यानुसार विराट कोहली खेळतो. तो धावगती कायम राखण्याचं काम चोख पार पाडचो. त्याचासारखाच फलंदाज संघाला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर हवा आहे. भारतासमोर मधल्या फळीतील फलंदाजीची डोकेदुखी आहे. वर्ल्ड कपच्या आधीपासून हा प्रश्न संघाला भेडसावत आहे. भारताने अनेक बदल करून नवे प्रयोग केले. मात्र कोणताही खेळाडू जागा निश्चित करू शकला नाही.

वर्ल्ड कपमध्ये भारताने लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर संधी दिली. मात्र, सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर त्याला सलामीला उतरावं लागलं. त्यामुळं पुन्हा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा विजय शंकर, ऋषभ पंत यांना संधी दिली मात्र दोघेही फारशी चमक दाखवू शकले नाहीत.

भारताला वर्ल़्ड कपमध्ये सेमीफायनलमधून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर भारताच्या कामगिरीवर आणि खेळाडूंच्या निवडीवर टीका केली जात आहे. त्यातच भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचीही चर्चा होत आहे. धोनीने निवृत्ती घेतली तर त्याची जागा घेणारा खेळाडू निवडण्याचं आव्हानही भारतासमोर असणार आहे.

सचिनप्रमाणेच धोनीने करायला हवं, माजी निवड समिती सदस्यांचा सल्ला

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या, पाहा VIDEO

First published: July 20, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading