एका ओव्हरमध्ये 6 षटकार देणाऱ्या गोलंदाजाचे निधन

एका ओव्हरमध्ये 6 षटकार देणाऱ्या गोलंदाजाचे निधन

वेस्ट इंडीजचे महान फलंदाज गॅरी सोबर्स यांनी इंग्लंडच्या ज्या गोलंदाजाच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले त्यांचे निधन झाले.

  • Share this:

लंडन, 01 ऑगस्ट : क्रिकेटच्या इतिहासात ज्यांच्या नावावर नकोसा विक्रम असेलले इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मॅल्कम नॅश यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. नॅश यांच्या गोलंदाजीवर 1968 मध्ये वेस्ट इंडीजचे महान फलंदाज गॅरी सोबर्स यांनी सहा षटकार मारले होते. याशिवाय काउंटी टीम लंकाशायरचे फलंदाज फ्रँक हेन्सनेसुद्धा पाच षटकार आणि एक चौकार मारला होता.

लंडनमध्ये राहत असलेल्या मॅल्कम नॅश यांचा जन्म 9 मे 1945 ला झाला होता. मध्यमगती गोलंदाज असलेले नॅश वेगवेगळ्या शैलीत गोलंदाजी करत होते. नॅश 1966 ते 1983 या काळात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. मॅल्कम नॅश क्लबचे महान खेळाडू तसेच क्लबच्या इतिहासाचा एक भाग होते. त्यांच्या संघाने 1969 मध्ये काउंटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले होते.

इंग्लंडच्या संघातून खेळण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती. मात्र देशांतर्गत सामन्यात त्यांनी आपल्या गोलंदाजीने कमाल केली होती. नॅश यांनी 336 प्रथम श्रेणी सामन्यात 7 हजार 129 धावा केल्या होत्या. यात 2 शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश होता. त्यांनी गोलंदाजीत 993 विकेट घेतल्या.

एका षटकात 6 षटकार देण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नकोसा विक्रम इंग्लंडच्याच स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर आहे. 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते.

बाद होताच पोलार्डनं ब्राव्होच्या पोटावर मारली बॅट, पाहा VIDEO

क्रिकेटमध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री EDच्या रडारवर

VIDEO: TIKTOKचा छंद तरुणाच्या अंगलट, बाईक अंगावर पडून गंभीर जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 1, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या