Home /News /sport /

'माही भाईमुळे माझी बॉलिंग सुधारली', टीम इंडियाच्या बॉलरची कबुली

'माही भाईमुळे माझी बॉलिंग सुधारली', टीम इंडियाच्या बॉलरची कबुली

टीम इंडियाकडून (Team India) सध्या खेळणाऱ्या अनेक बॉलर्सनी त्यांच्या चांगल्या कामगिरीचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) दिले आहे. या यादीत आणखी एकाची भर पडली आहे.

    मुंबई, 22 मे : टीम इंडियाकडून (Team India) सध्या खेळणाऱ्या अनेक बॉलर्सनी त्यांच्या चांगल्या कामगिरीचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) दिले आहे. ऑफ स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने काही दिवसांपूर्वी आपण धोनीला मिस करत असल्याचं म्हंटल होतं. या यादीमध्ये दीपक चहर (Deepak Chahar) हे आणखी एक नाव वाढले आहे.  चहर सध्या टीम इंडियाच्या टी20 टीमचा सदस्य आहे. त्याचबरोबर तो आयपीएल स्पर्धेत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळतो. आपल्या खेळाचा स्तर माही भाईमुळेच (महेंद्रसिंह धोनी) सुधारला असल्याची कबुली चहरनं दिली आहे. चहरने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, "माही भाईच्या कॅप्टनसीमध्ये खेळणे हे माझे स्वप्न होते. मी त्याच्या कॅप्टनसीमध्ये खूप काही शिकलो आहे. त्याच्या मार्गदर्शामुळेच माझ्या खेळाचा स्तर उंचावला आहे. त्यांनी मला जबाबदारी घेण्यास शिकवलं. मी 'पॉवर प्ले' मध्ये तीन ओव्हर्स टाकतो. टीमसाठी पहिली ओव्हर टाकणे सोपे नाही. मी यामध्ये सुधारणा केली आहे. त्याचबरोबर विशेषत: टी20 क्रिकेटमध्ये रन कसे रोखले पाहिजेत हे देखील शिकलो आहे." या आयपीएलमध्ये (IPL 2021) चहरनं 'पॉवर प्ले' चांगली बॉलिंग केली होती. या कामगिरीचे श्रेय देखील त्याने धोनीला दिले आहे. " तू 'पॉवर प्ले' बॉलर आहेस, असं धोनी मला नेहमी सांगतो. धोनीला त्याच्या खेळाडूंची चांगली माहिती आहे. तो हुशारीनं त्यांचा वापर करतो. कोणता बॉलर 'पॉवर प्ले' मध्ये चांगला आहे, 'कोण डेथ ओव्हर'मध्ये सरस आहे, याची त्याला चांगली कल्पना आहे." असे चहरने स्पष्ट केले. शिखर धवन कॅप्टन हवा टीम इंडिया जुलै महिन्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या टीममध्ये तरुण खेळाडूंना संधी मिळणार आहे. या सीरिजसाठी कॅप्टन म्हणून शिखर धवन (Shikhar Dhawan), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्या नावांची चर्चा आहे, पण टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) याला मात्र शिखर धवनला टीमचं नेतृत्व मिळावं, असं मत चहरनं व्यक्त केलं आहे. 'तो' असेपर्यंत मला....' महेंद्रसिंह धोनीबद्दल साहाचं मोठं वक्तव्य 'शिखर धवन बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे कॅप्टन म्हणून तो चांगला पर्याय आहे. सगळे खेळाडू धवनची आदर करतात आणि त्याचं ऐकतात,' असं चहर म्हणाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Csk, MS Dhoni, Team india

    पुढील बातम्या