विराट कोहलीसह 5 खेळाडूंच्या पगारात 200 टक्के वाढ, धोनीला वगळलं

विराट कोहलीसह 5 खेळाडूंच्या पगारात 200 टक्के वाढ, धोनीला वगळलं

या A+ श्रेणीतून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि आर. अश्विनला वगळण्यात आलंय.

  • Share this:

07 मार्च : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात तब्बल 200 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं ही निर्णय घेतलाय.

नवीन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंची नवी यादी जाहीर करण्यात आलीये. यामध्ये सिनीअर खेळाडूंसाठी बीसीसीआयनं A हा नवीन गट तयार केला आहे. या गटात विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रित बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश करण्यात आलाय.

या पाचही खेळांडूंसोबत प्रत्येकी 7 कोटी रूपयांचा करार करण्यात आलाय. या A श्रेणीतून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि आर. अश्विनला वगळण्यात आलंय.

महेंद्रसिंह धोनी, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, वृद्धिमान साहा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश मात्र A श्रेणीत करण्यात आला असून या सर्व खेळाडूंबरोबर प्रत्येकी 5 कोटी रूपयांचा करार करण्यात आलाय.

बीसीसीआयची नवीन आर्थिक करार यादी

कुणाला मिळणार 7 कोटी :

विराट कोहली

रोहित शर्मा

शिखर धवन

जसप्रीत बुमराह

भुवनेश्वर कुमार

कुणाला मिळणार 5 कोटी

महेंद्रसिंह धोनी

रविचंद्रन आश्विन

रविंद्र जाडेजा

वृद्धिमान साहा

मुरली विजय

चेतेश्वर पुजारा

अजिंक्य रहाणे

कुणाला मिळणार 3 कोटी

उमेश यादव

लोकेश राहुल

कुलदीप यादव

युझवेंद्र चहल

हार्दिक पांड्या

इशांत शर्मा

दिनेश कार्तिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2018 11:51 PM IST

ताज्या बातम्या