'भारताच्या क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव', मोहम्मद कैफने धोनीबद्दल व्यक्त केलं 'हे' मत

'भारताच्या क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव', मोहम्मद कैफने धोनीबद्दल व्यक्त केलं 'हे' मत

भारतीय क्रिकेट संघामध्ये एकजुटपणाचा अभाव असल्याचं मत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने व्यक्त केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मे : भारतीय क्रिकेट संघामध्ये एकजुटपणाचा अभाव असल्याचं मत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने व्यक्त केलं आहे. मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने Helo अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडले. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे.

मोहम्मद कैफ म्हणाला की, संघात सतत खेळाडूंची होणारी आदलाबदली आणि सतत नवे नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाहीय. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करत नाहीय. 2013 नंतर भारताने आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाहीय. यातून हे स्पष्ट दिसून येतंय की भारतीय संघामध्ये एकजुटपणाची कमतरता जाणवत आहे.

सौरव गांगुलीचे केलं कौतुक

सौरव गांगुलीने आमच्यावेळी सर्व खेळाडूंना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. आजही आपण पाहिलेत तर बीसीसीआयसारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारल्यावर दादाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पुढील काळात दादा भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणेल असा विश्वासही कैफने व्यक्त केला.

विराटचे नेतृत्व आणि निर्णय महत्वाचे

टी २० विश्वचषकाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, भारतीय संघात आता एक सुटसुटितपणा आणि समन्वय येणे गरजेचे आहे. कोणते खेळाडू संघात खेळणार हे  निश्चित करण्याची आवश्यकता आहे. भारतीय संघाला शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळताना अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे विराटचे नेतृत्व आणि त्याचे निर्णय खुप महत्वाचे असल्याचंही कैफ म्हणाला.

धोनीची संघाला गरज

गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीची संघाला गरज आहे असंही मोहम्मद कैफ म्हणाला. भारताचा महत्त्वाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी संघात असणे गरजेचे आहे. धोनी शिवाय भारतीय संघ अपूर्ण आहे. जेव्हा धोनी स्वत: सांगेल की आता मी थकलो आता निवृत्त होतो. तेव्हा मी समजेन त्याच्यातील क्रिकेट संपले आहे असंही कैफने सांगितलं.

हे वाचा : 'माझ्या निवडीसाठी लाच मागितली गेली', विराटच्या आरोपामुळे क्रिकेट विश्वात खबळबळ

First published: May 21, 2020, 10:17 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading