एक डाव असाही! 3 बाद 34 वरून सर्वबाद 35

एक डाव असाही! 3 बाद 34 वरून सर्वबाद 35

मध्य प्रदेशने 3 बाद 35 नंतर एकही धाव न काढता आपल्या उरलेल्या सर्व विकेट गमावल्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असावं.

  • Share this:

क्रिकेटमध्ये दररोज अनेक विक्रम बनतात आणि मोडलेही जातात. सध्या देशात रणजी क्रिकेटचा फिव्हर आहे. नुकत्याच खेळल्या गेलेल्या रणजी सामन्यात एक विचित्र विक्रम मध्य प्रदेशच्या नावावर झाला. 3 बाद 34 धावांनंतर अख्खा संघ 35 वर गुंडाळला.

इंदोरमध्ये रणजी ट्रॉफीच्या ब गटात मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्यात लढत झाली. मध्य प्रदेशचा कर्णधार नमन ओझाने नाणेफेक जिंकून आंध्र प्रदेशला फलंदाजीची संधी दिली.

आंध्र प्रदेशने पहिल्या डावात 132 धावा केल्या. मध्य प्रदेशकडून इश्वर पांडेने चार गडी बाद केले तर गौरव यादव आणि कार्तिकेय यांनी प्रत्येकी तीम गडी बाद केले. त्यानंतर आंध्र प्रदेशच्या पी गिरीनाथच्या भेदक माऱ्यासमोर मध्य प्रदेशचा संघ 91 धावा करू शकला. पी गिरीनाथने 29 धावांत 6 गडी बाद केले.

दुसऱ्या डावात आध्र प्रदेशने 301 धावा काढून मध्यप्रदेशासमोर 343 धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशने 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर जे घडलं ते आश्चर्यचकित करणारं होतं.

मध्य प्रदेशने 3 बाद 35 धावानंतर एकही धाव न काढता आपल्या उरलेल्या सर्व विकेट गमावल्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असावं.

मध्य प्रदेशने 13 षटकांत 3 बाद 35 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या 23 चेंडूत एकही धाव न काढता 6 फलंदाज एका पाठोपाठ बाद झाले. तर जखमी झाल्यानं गौरव यादव फलंदाजी करायला मैदानात उतरला नाही.

आंध्र प्रदेशने हा सामना 307 धावांनी जिंकत बादफेरीत प्रवेश केला. आंध्रच्या शशिकांतनं 18 धावांत 6 तर विजयकुमारनं 17 धावांत 3 गडी बाद केले. तर पहिल्या डावात 6 गडी बाद करणाऱ्या गिरीनाथला गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 09:14 PM IST

ताज्या बातम्या