कोलंबो, 3 डिसेंबर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) एका आठवड्यातच लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League) सोडून पाकिस्तानला परतला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण पाकिस्तानला परतत असल्याचं शाहिद आफ्रिदीने सांगितलं आहे. तसंच परिस्थिती नीट झाली, तर आपण स्पर्धेसाठी पुन्हा येऊ, असंही तो म्हणाला आहे. आफ्रिदीच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे तो एलपीएल सोडून गेला आहे. शाहिद आफ्रिदी गॉल ग्लॅडिएटर्सचा कर्णधार आहे.
Do you know the reason for @SAfridiOfficial 's return to the country?
स्पर्धेमध्ये परत येण्यासाठी आफ्रिदीला क्वारंटाईन व्हावं लागू शकतं, पण स्पर्धेतली मेडिकल टीम आफ्रिदीला इतर खेळाडूंप्रमाणे क्वारंटाईनमध्ये न पाठवण्याची शक्यता आहे. आफ्रिदीला आधीच कोरोना होऊन गेला आहे. कोविड टेस्टदरम्यान त्याच्या शरिरामध्ये ऍन्टीबॉडीज सापडल्या होत्या, त्यामुळे 24 नोव्हेंबरला श्रीलंकेला पोहोचताच पुढच्या तीन दिवसांमध्येच त्याला खेळण्याची परवानगी मिळाली होती.
Unfortunately I have a personal emergency to attend to back home. I will return to join back my team at LPL immediately after the situation is handled. All the best.
शाहिद आफ्रिदी पाकिस्तानमध्ये परत गेल्यामुळे गॉल ग्लॅडिएटर्सना मोठा धक्का बसला आहे. आफ्रिदीच्या टीमला या स्पर्धेत एकही मॅच जिंकता आलेली नाही. काहीच दिवसांपूर्वी आफ्रिदीने जाफना स्टॅलियन्सविरुद्ध फक्त 23 बॉलमध्ये 58 रन केले होते. या इनिंगमध्ये त्याने 6 सिक्स मारले होते. आफ्रिदीने फक्त 20 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं होतं.