Home /News /sport /

मोहम्मद आमीर-नवीन उल हक मैदानातच भिडले, आफ्रिदीने घेतली शाळा

मोहम्मद आमीर-नवीन उल हक मैदानातच भिडले, आफ्रिदीने घेतली शाळा

लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League) मध्ये कॅन्डी टस्कर्स (Kandy Tuskers) आणि गेल ग्लॅडिएटर्स (Galle Gladiators) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये मोहम्मद आमीर (Mohammad Amir) आणि नवीन उल हक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मॅच संपल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) ही संतापलेला दिसला.

पुढे वाचा ...
  मुंबई, 1 डिसेंबर : लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League) मध्ये वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. कॅन्डी टस्कर्स (Kandy Tuskers) आणि गेल ग्लॅडिएटर्स (Galle Gladiators) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये मोहम्मद आमीर (Mohammad Amir) आणि नवीन उल हक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मॅच संपल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीही संतापलेला दिसला. आफ्रिदीने नवीन उल हक (Naveen Ul Haq) याला याबाबत विचारणा केली, त्यावेळी नवीन उल हकने आफ्रिदीशीही वाद घातला. पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमीर लंका प्रीमियर लीगमध्ये गेल ग्लॅडिएटर्स आणि नवीन उल हक कॅन्डी टस्कर्सकडून खेळत आहे. शाहीद आफ्रिदी ग्लॅडिएटर्स टीमचा भाग आहे. मॅच सुरू असताना नवीन आणि आमीर यांच्यात भांडण झालं. नवीनने मोहम्मद आमीरला शिव्या दिल्या, त्यावेळी मैदानातल्या खेळाडूंनी नवीनला थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही नवीन थांबला नाही आणि आमीरशी हुज्जत घालत राहिला. मॅच संपल्यानंतर शाहीद आफ्रिदी या भांडणात पडला.
  View this post on Instagram

  A post shared by Cricingif (@cricingif)

  मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांसोबत हात मिळवत होते, तेव्हा आफ्रिदीने नवीनला काय झालं? असं विचारलं, त्यावर 21 वर्षांचा नवीन पुन्हा चिडला. यानंतर शाहीद आफ्रिदीने त्याची शाळा घेतली. 'तुझा जन्म होण्याआधी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केलं होतं,' असं आफ्रिदी म्हणाला. मोहम्मद आमीर आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या भांडणामध्ये मुनाफ पटेलही पडला होता. मुनाफ पटेलने नवीनला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकलं नाही. अखेर आफ्रिदीने मॅचनंतर नवीनवर राग काढला.
  Published by:Shreyas
  First published:

  पुढील बातम्या