ICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा

वेस्टइंडीजमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप टी २०मध्ये भारताने पाकिस्ताना धुळ चारत शानदार विजय मिळवलाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2018 12:04 AM IST

ICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा

११ नोव्हेंबर :  वेस्टइंडीजमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप टी २०मध्ये भारताने पाकिस्ताना धुळ चारत शानदार विजय मिळवलाय.  भारतीय महिला टीमची तडाखेबाज फलंदाज मिताली राजच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने पाकिस्तानाला ७ विकेटने पराभूत केलं.


भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का बसला. आयशा जाफर शुन्यावर बाद झाली. त्यानंतर कर्णधार जावेरिया खान हीने टीमची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला खरा पण तिही १७ धावा करून माघारी परतली. सलामीची जोडी माघारी परतल्यामुळे पाकला धक्का बसला होता. मात्र, मधल्या फळीतील निदा दार आणि  बिस्माह मारूफ यांनी धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत टीमचा धावपलक उंचावला. निदा दारने ५2 तर  बिस्माह मारूफ ५३ धावा केल्यात. या दोघींना सोडून इतक कोणत्याही खेळाडूला मोठा धावफलक उभारता आला नाही. निर्धारित २० षटकात ७ बाद १३३ धावा पाकिस्तान टीमने केल्यात.


१३४ धावांचे आव्हान भारताने १९ व्या षटकात पार केलं. मिताली राजने ४७ चेंडूत ७ चौकार लगावत ५६ धावा केल्यात. तर स्मृती मंधाना मितालीला चांगली साथ देत २६ धावा  केल्यात दोघांचीच्या भक्कम भागीदारीमुळे भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. जेमिमाह रोड्रिग्ज आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

Loading...


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 09:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...