LIVE NOW

भारताची विजयी हॅटट्रिक, विंडीजला व्हाईटव्हाॅश

शिखर धवनची तडाखेबाज ९२ धावा आणि ऋषभ पंतने केलेल्या जिगबाज ५८ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने वेस्ट इंडीजचा सुपडा साफ करत दणदणीत विजय मिळवला

Lokmat.news18.com | November 12, 2018, 12:00 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 12, 2018
auto-refresh

Highlights

Load More
11 नोव्हेंबर : शिखर धवनची तडाखेबाज ९२ धावा आणि ऋषभ पंतने केलेल्या जिगबाज ५८ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने वेस्ट इंडीजचा सुपडा साफ करत दणदणीत विजय मिळवला. भारताने ६ गडी राखून टी-२० मालिका जिंकली.   वेस्ट इंडिजने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या होत्या. १८१ धावांचा पाठलाग करत असताना भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ४ धावा करून झटपट बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुल मैदानात आला मात्र तोही फार काल टिकू शकला नाही. लोकेश राहुल १७ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंत आणि शिखर धवनने दमदार फलंदाजी करत भारताचा विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला. शिखर धवनने ६२ चेंडूत २ षटकार आणि १० चौकार लगावत ९२ धावा केल्यात. मात्र, अखेरच्या षटकात विजयी षटकार लगावण्याच्या नादात तो झेलबाद झाला. तर ऋषभ पंतने ३८ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकार लगावत ५८ धावा केल्यात. अखेरच्या षटकात मनीष पांडे आणि दिनेश कार्तिकने १ धाव काढून विजयाची औपचारिक्ता पूर्ण केली. त्याआधी  निकोलस पूरणची धडाकेबाज अर्धशतकी खेळी आणि डेरेन ब्रावोच्या नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या बळावर विंडीजने १८१ धावांपर्यंत मजल मारली होती. निकोलस पूरणने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार लगावत अर्धशतक झळकावले. ओपनिंग जोडी होप्स आणि हेटमायरने सावध सुरुवात करत ५१ धावांची भागिदारी केली.  पॉवर प्लेच्या पहिल्या सहा षटकार दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. अशात सातवे षटक टाकत असताना रोहित शर्माने मोठे बदल केले.  चहलने आपल्या पहिल्या षटकात आपला करिष्मा दाखवाला आणि शाई होपला बाद करून रोहित शर्माची मोठी डोकेदुखी दूर केली.  चहलच्या गोलदांजीवर षटकार लगावण्याच्या नादात होप वाशिंग्टन सुंदरच्या हातात झेल देऊन बसला. होप २२ चेंडूत २४ धावा करू शकला. चहलने पुढच्या षटकात वेस्टइंडीजला दुसरा झटका दिला. त्याने हेटमायरला २६ धावांवर क्रृणाल पांड्याला झेल देऊन बाद झाला. त्यानंतर दिनेश रामदीन १५ धावा करून स्वस्तात बाद झाला. तर दुसरीकडे निकोलस पूरण आणि डेरेन ब्रावो फटकेबाजी सुरूच ठेवत धावफलक वाढवला. निकोलसने नाबाद ५३ तर ब्रावोने नाबाद ४३ धावा करून विंडीजचा धावफलक १८१ पर्यंत पोहोचवला.  
corona virus btn
corona virus btn
Loading