LIVE NOW

Live Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक

Live India Vs Pakistan Cricket Match Streaming Online on Hotstar, Live Cricket Score, Asia Cup 2018: पाकिस्तानने भारताला 238 धावांचे टार्गेट दिले आहे.

Lokmat.news18.com | September 24, 2018, 12:09 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 24, 2018
auto-refresh

Highlights

Load More
दुबई, 23 सप्टेंबर : आशिया कपमध्ये पाकिस्ताने दिलेल्या  238 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या शिखर धवन आणि रोहित शर्माने धडाकेबाज सुरुवात केलीये. दोघांनी 28 व्या ओव्हरपर्यंत 164 धावांची भक्कम भागिदारी केलीये. रोहित आणि शिखरने शानदार अर्धशतकं झळकावलीये. शिखर धवनने तडाखेबाज फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. परंतु, 114 धावा करून तो रन आऊट झाला. पण दुसरीकडे रोहित शर्माने फटकेबाजी सुरूच ठेवली.119 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकार लगावत त्याने नाबाद 111 धावांची खेळी केली. अंबाती रायडूने साथ देऊन विजयाची औपचारिकत्ता पूर्ण केली.  भारताने 39.3 ओव्हरमध्येच 238 धावा करून सामना खिश्यात घातला. या विजयासह टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचलीये. दुबईमध्ये एशिया कपमधील भारताविरुद्ध पाकिस्तानचा सामना सुरू आहेय या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  फखर जमान आणि इमाम उल हकने पाकिस्तानला चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या ७ ओवरमध्ये एकही विकेट न गेल्याने कर्णधार रोहित शर्माने आपलं ट्रंप कार्ड वापरलं. पॉवर प्ले असताना देखील रोहित शर्माने यजुवेंद्र चहलला ओवर टाकायला सांगितली. या फिरकी गोलंदाजाने मात्र कर्णधाराचा विश्वास मोडला नाही. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर इमाम उल हकला एलबीडब्ल्यू आऊट केलं. विशेष म्हणजे त्याच्या अपीलला नकार दिला. त्यांतर धोनीकडून इशारा मिळताच रोहितने रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने टीवी रिप्ले पाहिल्यानंतर निर्णय बदलला आणि इमाम उल हकला आऊट केलं. अशा प्रकारे रोहितच्या निर्णयामुळे पाकिस्तानला झटका बसला. मात्र, त्यानंतर शोएब मलिक आणि सरफराज अहमदने आपल्या टीमची कमान सांभाळून धरली. मलिकने अर्धशतक झळकावून 78 धावांवर बाद झाला. त्यानंतर सरफराज 44 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या आसिफ अली भारतासाठी डोकेदुखी ठरला. 42 व्या ओव्हरमध्ये आसिफने 2 चौकार आणि 2 षटकार लगावून टीमची स्थिती सुधारली. पण, त्याची ही खेळी जास्तवेळ चाललली नाही. युजवेंद्र चहलने त्याला बाहेरचा रस्त्ता दाखवला. त्यानंतर नवाझ आणि हसनने धावा वाढवण्याचा प्रयत्न केला पण तो अपुरा ठरला. पाकिस्तानाचा संघ 237 धावांवर गारद झाला.
corona virus btn
corona virus btn
Loading