INDvsENG 3rd ODI : इंग्लंडने वन-डे मालिका जिंकली, भारतावर 8 गडी राखून विजय

INDvsENG 3rd ODI : इंग्लंडने वन-डे मालिका जिंकली, भारतावर 8 गडी राखून विजय

  • Share this:

इंग्लंड, 17 जुलै : कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रुट यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर वन-डे मालिकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला आहे. इंग्लंडने ही मालिका २-१ ने  खिशात घातली.

४४.3 षटकांत दो बाद 260 धावा करत इंग्लंडने भारतावर विजय मिळवला. जो रुटने नाबाद १०० तर कर्णधार इयॉन मॉर्गनने नाबाद ८८ धावांची खेळी केली. रुट आणि मॉर्गन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १८६ धावांची भागीदारी केली.

इंग्लंडने वन-डे मालिका जिंकली, भारतावर 8 गडी राखून विजय

कर्णधार विराट कोहलीच्या शानदार 71 आणि शिखर धवनच्या तडाखेबाज 44 धावांच्या खेळीवर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 257 धावाचं आव्हान दिलंय. रोहित शर्मा आणि सुरेश रैना वगळता इतर खेळाडूंनी संयमी खेळी करत 256 धावाचा टप्पा गाठला.

तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवशीय सामन्यासाठी इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत संयमी खेळी केली. मात्र,ओपनिंग जोडीला आलेला रोहित शर्मा 2 धावा करून झटपट बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवनने टीम इंडियाची कमान सांभाळली. दोघांनी शानदार फटकेबाजी केली. शिखर धवन 44 धावा करून बाद झाला. अवघ्या सहा धावांनी अर्धशतक हुकले. धवन बाद झाल्यानंतर विराटने कार्तिकच्या भागीदारीने स्कोअरबोर्ड हलताच ठेवला. विराटने 72 चेंडूत 8 चौकार लगावत 71 धावा केल्यात. 24.2 षटकामध्ये कार्तिक 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर 30.1 षटकात विराट बाद झाला. महेंद्रसिंग धोनीने 66 चेंडूत 4 चौकार लगावत 42 धावा केल्यात.  त्यानंतर हार्दिक पांड्या 21, भुवनेश्वर कुमार 21 तर शार्दुल ठाकूरने 13 धावात 2 षटकार लगावत 22 धावा कुटल्यात.

अशा आहे टीम

भारत :विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन , रोहित शर्मा , लोकेश राहुल , महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक , सुरेश रैना , हार्दिक पंड्या , कुलदीप यादव , युजवेंद्र चहल , श्रेयस अय्यर , सिद्धार्थ कौल , अक्षर पटेल , उमेश यादव , शार्दुल ठाकुर , भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड :इयोन मोर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो , जोस बटलर (विकेटकीपर), मोईन अली , जो रूट , जेक बॉल , लियाम प्लंकेट , बेन स्टोक्स , आदिल राशिद , डेविड विली , मार्क वुड आणि जेम्स विंस.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 11:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading