LIVE NOW

Live Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय

Lokmat.news18.com | September 21, 2018, 11:56 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 21, 2018
auto-refresh

Highlights

Load More
 दुबई, 20 सप्टेंबर : आशिया कपमध्ये सुपर फोरमध्ये 174 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने बांग्लादेशवर सहज विजय मिळवला. रोहित शर्माची 83 धावांची कर्णधार इनिंग, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने विजयी हॅटट्रिक साधली. भारताने टाॅस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय गोलंदाजांनी खरा ठरवला. बांग्लाचा अवघा संघ 173 धावात गारद झाला. 174 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली राहिली. ओपनिंग आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने 61 धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. मात्र, 40 धावांवर खेळत असलेल्या शिखर धवन शाकिब हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने रिव्ह्यु घेण्याचा विचार केला. पण त्यानंतर कर्णधार रोहित शर्मासोबत चर्चा करून तो माघारी परतला. त्यानंतर मैदानात आलेल्या अंबाती रायडूने रोहितला साथ दिली. पण तो फार काळ टिकू शकला नाही. रायडू 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहितने फटकेबाजी सुरूच ठेवली. आणि षटकार लगावून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर महेंद्र सिंग धोणी आणि रोहित ही जोडी बऱ्याच दिवसांनंतर पाहण्यास मिळत आहे. पण विजयी षटकार लगावण्याचा नादात धोनी 33 धावांवर झेल बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि रोहित शर्माने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. रोहित शर्माने 104 चेंडूत 3 षटकार, 4 चौकार लगावून 83 धावा केल्यात. त्याआधी टीम इंडियाच्या रविंद्र जडेजा, जसप्रीत बुम्ररा आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्यापुढे बांग्लादेशचा पार खुर्दा पडला.अवघा संघ 173 धावात गारद झाला. भारताने टाॅस जिंकून बांग्लादेशला पहिले फलंदाजी करण्याचं आव्हान दिलं. पण रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारने बांग्ला टीमला सुरुंग लावला. रवींद्र जडेजाने 4 गडी बाद करून बांग्लादेशला नांगी टाकण्यास भाग पाडलं.  रवींद्र जडेजाने निर्धारित 10 षटकांमध्ये 29 धावा देऊन 4 गडी बाद केले.टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांग्ला टीमची धडपड सुरूच होता. 31 व्या षटकानंतर बांग्लादेशने कशाबशा 100 धावा पूर्ण केल्यात. भुवनेश्वर कुमारने 10 षटकं टाकत 32 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केले. तर जसप्रीत बुम्रानेही बांग्लादेशच्या खेळाडूंना सळो की पळो करून सोडलं. 9.1 षटकं टाकत त्याने 37 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केले. तर मैदानात शिखर धवन मांडी थोपटून आपला जलवा कायम राखला. शिखर धवन आजच्या सामन्यात 4 झेल घेतले. बांग्लादेशकडून मेहंदी हसनने  सर्वाधिक 42 धावा केल्यात. त्यापाठोपाठ कर्णधार मशरेफ मुर्तजा 26 तर  मोहम्मुदला 25 धावा करू शकले.
corona virus btn
corona virus btn
Loading