LIVE NOW

Asia Cup 2018 : भारताने जिंकला आशिया कप, बांग्लादेश पराभूत

Live Cricket Score, India vs Bangladesh Asia Cup 2018 लाईव्ह क्रिकेट स्कोअर - India vs Bangladesh , भारत विरुद्ध बांग्लादेश, Asia Cup 2018 Live Score | Live Cricket Scorecard, Updates and Commentary

Lokmat.news18.com | September 29, 2018, 8:55 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 29, 2018
auto-refresh

Highlights

Load More
दुबई, 28 सप्टेंबर : भारत आणि बांग्लादेशमध्ये रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने बांग्लादेशला लोळवून सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरले. पायाला दुखापत झालेल्या केदार जाधवने अखेरच्या चेंडूवर विजय खेचून आणला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुबईत झालेल्या आशिया कप जिंकून आम्हीच आशियाचे चॅम्पियन हे दाखवून दिलं. आशिया कपमध्ये बांग्लादेशने दिलेल्या 223 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात आलेल्या टीम इंडियाने जशास तसे उत्तर दिले. ओपनिंग जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवनने तडाखेबाज फलंदाजी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. पण 5 व्या षटकात शिखर धवन 15 धावा करून बाद झाला. धवनने 14 चेंडूत 3 चौकार लगावून 15 धावा केल्या होत्या. धवन नंतर अंबाती रायडू मैदानात आला. पण 2 धावा करून तो झटपट बाद झाला. 2 गडी बाद झाल्यामुळे टीमवर दडपण वाढलं. पण तरीही रोहित शर्माने फटकेबाजी सुरूच ठेवली. पण 48 धावा करून रोहित शर्मा बाद झाला. अवघ्या 2 धावामुळे रोहित शर्माचे अर्धशतक हुकले. रोहितनंतर महेंद्र सिंग धोनी आणि दिनेश कार्तिकने टीमची कमान सांभाळली. पण धोनी 36 तर दिनेश कार्तिक 37 धावा करून बाद झाले. धोनी बाद झाल्यानंतर टीमच्या चिंता वाढली. दुसरीकडे केदार जाधवच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तोही आता माघारी परतला होता. भारताचा विजय टप्प्यात आला. आता टीम इंडियाची मदार रविंद्र जडेजावर होती. भुवनेश्वर आणि जडेजाने संयमी खेळी केली. पण 48 व्या षटकामध्ये  जडेजा 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारही 49 व्या षटकामध्ये 21 धावा करून बाद झाला. दुखापत झालेला केदार जाधव परत आला. अखेरच्या षटकात 6 चेंडूत 6 धावा लागत असताना कुलदीप यादव आणि केदार जाधवने विजयी शिल्पकाराची भूमिका घेतली. अखेरच्या चेंडूवर धाव घेऊन विजय मिळवला.   त्याआधी भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  पहिला फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेशने लिट्टन दासच्या शतकी खेळीच्या बळावर 222 धावांपर्यंत मजल मारली. भारतासमोर विजयासाठी आता 223 धावांचे टार्गेट आहे.   भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेश टीमच्या लिट्टन दास आणि मेहदी हसनने शानदार ओपनिंग करून दिली. आणि  मोठ्या स्कोअरकडे वाटचाल करणार असे संकेत दिले. पण मेहदी हसन 33 धावांवर बाद झाल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे बांग्लादेशचा डाव गडगडला. लिट्टल दासने एकाकी झुंज देत 121 धावा केल्यात. यात त्याने 2 षटकार आणि 11 चौकार लगावले. 21 ओव्हरमध्ये मेहदी हसन बाद झाला. कुलदीप यादव आणि केदार जाधवने बांग्ला टीमला सुरूंग लावला.   कुलदीपने 3 तर केदारने 2 गडी बाद केले. यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीने चपळाई दाखवत 2 गडी बाद केले. यात महत्त्वाची विकेट होती ती लिट्टन दासची. तर 3 गडी हे स्वस्तात धावबाद झाले. 21 व्या षटकारनंतर सामन्याचं चित्र पलटलं आणि भारताने त्यावर ताबा घेतला. लिट्टन दास, मेहदी हसन यांच्यानंतर सोमया सरकारने 33 धावा केल्या. त्यानंतर एकाही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.    
corona virus btn
corona virus btn
Loading