दुबई, 25 सप्टेंबर : 253 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या कॅप्टन कूल धोनीच्या टीम इंडियाला चांगलेच 'काबुली'चणे चावावे लागले. अफगान टीमने भारताला कडवी झुंज दिली. अखेरच्या चेंडूवर रविंद्र जडेजा चुकीचा षटकार सामना अनिर्णित ठरवला.
'दुष्मन को कभी कमजोर नही समझ ना चाहीये'असाच प्रत्यय टीम इंडियाला आलाय. पाकिस्तानला दोनदा, बांग्लादेश, हाँगकाँगला पराभूत करून भारताने फायनलमध्ये धडक मारली.त्यामुळे टीम इंडियाला फारशी चिंतेची बाब नव्हती. त्यामुळेच टीममध्ये बदल करण्यात आले.रोहित शर्मासह जसप्रित ब्रुमरा, भुवनेश्वर सारख्या फार्मातल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. धोनीच्या नेतृत्वाखाली नवखी टीम मैदानात उतरली.अफगान टीमने टॉस जिंकून पहिली फलंदाजी केली आणि २५२ धावा कुटल्या.
धोनीच्या नेतृत्वाखाली केएल राहुल आणि अंबाती रायडूने सुरुवात केली. केएल राहुल आणि रायडूने अफगानिस्तानला जशाच तसे उत्तर जोरदार फटकेबाजी केली. दोघांनीही शानदार अर्धशतकं झळकावली. अंबाती रायडूने 49 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार लगावत 57 धावा केल्यात. तर केएल राहुलने 1 षटकार आणि 5 चौकार लगावत 60 धावा केल्या. दोघांच्या भक्कम भागिदारीमुळे भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असं वाटत होतं पण तसं झालं नाही. कर्णधार धोनीचा करिष्मा दिसेल अशी अपेक्षा होती पण तो ८ धावा करून चुकीच्या निर्णयामुळे बाद झाला. त्यानंतर मनिष पांडेही ८ धावा करून बाद झाले. त्यानंतर मधल्या फळतली जोडी केदार जाधव आणि रविंद्र जडेजाने कमान सांभाळली. पण केदार जाधव १९ रन्स करून रनआऊट झाला. आता पूर्ण मदार ही रविंद्र जडेजावर होती. शेवटपर्यंत त्याने खेळ आपल्या ताब्यात ठेवला. त्याला साथ देण्यासाठी आलेला दीपक चाहर १२, कुलदीप यादव ९ रन्स करून माघारी परतले.सिद्धार्थ कौलही भोपळाही फोडता परतला. भारताला विजयासाठी ६ चेंडूत ७ धावांची गरज होती.दोन रन्स काढल्यानंतर जडेजाने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. नंतर शानदार चौकार लगावून सामना बरोबरीत आणला.आता २ चेंडूत १ धाव लागत होती, जडेजाने विनिंग षटकार लगावण्याचा प्रयत्न केला तिथेच तो फसला आणि बाद झाला. जडेजाने २५ धावा करून झेलबाद झाला. भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावला गेला.
त्याआधी अफगानिस्तानच्या मोहम्मद शहजादच्या झुंजार शतकी खेळी आणि मोहम्मद नबीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर अफगान टीनमे 252 धावापर्यंत मजल मारली.
अफगानिस्तानने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टाॅस करण्यासाठी धोनी मैदानात आल्यामुळे धोनीच टीमचे नेतृत्व करणार यावर शिक्कामोर्तब झाले. तसंच टीम इंडियामध्ये बदल करण्यात आले. केएल राहुल, दीपक चाहर, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली. मात्र, अफगान सैनेनं धडाकेबाज सुरूवात केली. ओपनिंगला आलेल्या मोहम्मद शहजादने तुफान खेळी केली. तमोहम्मद शहजादने 6षटकार आणि 11 चौकार लगावून 124 धावा ठोकल्यात. तर नबीने 4 षटकार आणि 3 चौकार लगावून 64 धावा केल्यात. पण दुसरीकडे त्याला साथ देणारे इतर खेळाडू मात्र स्वस्तात बाद झाले. रविंद्र जडेजा 3 तर कुलदिप यादवने 2 गडी बाद केले. सिद्धार्थ कौलने 9 षटक टाकून सर्वाधिक 58 धावा दिल्यात. अफगानिस्तान टीमने निर्धारित 50 षटकात 252 धावा केल्यात. टीम इंडियापुढे विजयासाठी 253 धावांचे आव्हान दिले होते.