India vs West Indies 2nd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज सामना अनिर्णित

India vs West Indies 2nd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज सामना अनिर्णित

Live Cricket Score, India vs West Indies, 2nd ODI, लाईव्ह क्रिकेट स्कोअर - भारत विरुद्ध वेस्‍टइंडीज, भारत विरुद्ध वेस्‍टइंडीज, India vs West Indies, 2nd ODI, Live Score | Live Cricket Scorecard, Updates and Commentary

  • Share this:

विशाखापट्टणम, २४ ऑक्टोबर २०१८- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहीला. ५ सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिला एकदिवसीय सामना जिंकला. दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने भारताकडे अजूनही १ सामन्याची आघाडी आहे. विराट कोहलीप्रमाणेच या सामन्याचा हिरो ठरला वेस्ट इंडिजचा शाई होप. होपच्या नाबाद १२३ (१३४) धावांमुळे वेस्ट इंडिजने हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला.

विशाखापट्टणम येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेखेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांत भारताने पाच गडी गमावत ३२१ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने नाबाद दीडशतक (१५७) साजरे करत भारताला मोठी धावसंख्या उभारायला मदत केली. विराटला साथ मिळाली ती अंबाती रायडूच्या ७३ धावांची. सलामीवीर शिखर धवन (२९) आणि रोहित शर्मा (४) स्वस्तात बाद झाल्यावर विराट आणि रायडूने तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. रायडू बाद झाल्यानंतर धोनी (२०), पंत (१७) आणि जडेजा (१३) यांनी विराटला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर खेळाडूंच्या या भागीदारीने विराटने ३२१ धावांचा डोंगर रचला.

भारताप्रमाणेच वेस्ट इंडीजची सुरूवात काही चांगली झाली नाही. किरन पॉवेल (१८) आणि चंद्रपॉल हेमराज (३२) लवकर बाद झाले. त्यानंतर सॅम्युअल्स (१३) लवकर तंबूत परतला. मात्र त्यानंतर शाई होप (१२३) आणि शिमरॉन हेटमेयरने (९४) विंडीजचा डाव सावरला. शेवटच्या षटकापर्यंत दुसरा सामना रंजक झाला. होपच्या आक्रमक खेळीमुळे हा सामना अनिर्णित राहीला. होपचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याती या सर्वोत्कृष्ट धावा आहेत.

भारताच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. कुलदीप यादव वगळता कोणत्याही गोलंदाजाला आश्वासक कामगिरी करता आली नाही. कुलदीपने १० षटकांत ६७ धावा देत ३ गडी बाद केल्या. मोहम्मद, शमी, युझवेंद्र चहल आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. रविंद्र जडेजाला एकही गडी बाद करता आला नाही. विराट कोहलीला त्याच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मॅन ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले.

First published: October 24, 2018, 9:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading