News18 Lokmat

India vs New Zealand 1st ODI- भारताचा आठ विकेट राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय

भारतासाठी गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वाधिक ४ गडी बाद केले तर फलंदाजीत शिखर धवनने ७५ धावा केल्या.

News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2019 02:21 PM IST

India vs New Zealand 1st ODI- भारताचा आठ विकेट राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय

नॅपिअर, 23 जानेवारी :  पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी शिखर धवनने सर्वाधिक ७५ (१०३) धावा केल्या. शिखरला कर्णधार विराटने चांगली साथ दिली. विराटने ४७ धावा केल्या. शिखरसोबत अंबाती रायडूने धावांची भागीदारी करत अखेर भारताला विजय मिळवून दिला. मोहम्मद शमीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. टीम इंडियाला पहिला धक्का रोहित शर्माच्या स्वरुपात मिळाला. रोहितने २४ चेंडूत ११ धावा केल्या. यानंतर कोहली आणि धोनीने टीमची कमान सांभाळली. या दरम्यान धवनने त्याचे करिअरमधील २७ वे अर्धशतक पूर्ण केले. जवळपास नऊ सामन्यांनंतर धवनने अर्धशतक साजरं केलं.

सूर्याचा प्रकाश फलंदाजांच्या डोळ्यावर सरळ पडत असल्यामुळे शिखरला चेंडू दिसत नव्हता. साधारणपणे क्रिकेटच्या मैदानात पीच हे उत्तर- दक्षिण दिशेला असतं. ज्यामुळे प्रकाशाचा त्रास होत नाही. मात्र या मैदानात पीच पूर्व- पश्चिम दिशेला असल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. आता सूर्य मावळल्यानंतरच सामन्याला सुरुवात केली जाईल. यामुळे ३० मिनिटांसाठी सामना थांबवण्यात आला आहे. आतापर्यंत भारताने रोहित शर्माची एक विकेट गमावत ४४ धावा केल्या आहेत. शिखर धवन २९ धावांवर तर विराट कोहली २ धावांवर खेळत आहेत.

न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या३८ षटकांमध्ये १५७ धावा करत बाद झाला. न्यूझीलंडकडून कर्णधार विलियमसनने सर्वधिक ६४ धावा केल्या. त्याच्याशिवाय रॉस टेलर २४, टॉम लेथम ११, सँटनर १४ आणि निकल्स १२ धावा करत बाद झाले. तर उरलेल्या पाच फलंदाजांना १० चा आकडाही पार करता आला नाही. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार गडी बाद केले तर मोहम्मद शमीने तीन, युझवेंद्र चहलने दोन आणि केदार जाधवने एक गडी बाद केला.

न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. दुसऱ्या षटकात मोहम्मद शमीने गप्टिलला त्रिफळाचीत करत भारताला पहिलं यय मिळवून दिलं. यानंतरच्या षटकात न्यूझीलंडचा फलंदाज मनरोने भुवनेश्वर कुमारला दोन चौकार लगावले. त्याच्या नंतरच्या षटकात शमीने त्यालाही त्रिफळाचीत केले. यानंतर टेलर आणि विलियम्सने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. टेलर २४ झावांवर असताना युझवेंद्र चहलने त्याला बाद केले. अवघ्या ५२ धावांमध्ये न्यूझीलंडचे तीन गडी बाद झाले होते.

यानंतर विजय शंकरच्या चेंडूवर विलियमसनही झेल बाद होता होता वाचला. एकीकडे फलंदाज डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. तर भारतीय गोलंदाज त्यांना थोडीशीही उसंत देत नव्हते. यानंतर चहलने त्याच्या चेंडूवर लेथनला फक्त ११ धावांवर बाद केलं. यासोबतचन्यूझीलंडच्या चार फलंदाज साजेशी कामगिरी न करता तंबूत परतले. यानंतर विलियमसनने खिंड लढवत धावसंख्या १०० च्या पार नेली. तेव्हा पार्ट टाइम गोलंदाज केदार जाधवने हेनरी निकल्सला बाद केले. कुलदीप यादवने निकल्स (१२) चा अप्रतिम झेल घेत त्याला माघारी पाठवले. अशाप्रकारे अवघ्या १०७ धावांमध्ये न्यूझीलंडचे पाच गडी बाद झाले.

Loading...

नेपियर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमनसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  न्यूझीलंडने या सामन्यासाठी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या संघामध्ये दोन बदल केले आहेत. मिचेल सेंटनर आणि डग ब्रेसवेलचा संघात समावेश केला आहे. अष्टपैलू जलदगती गोलंदाजाची आवश्यकता असल्यामुळे ब्रेसवेलला संघात स्थान देण्यात आले आहे. तर टीम इंडियामध्येही दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. अंबाती रायडू ऐवजी दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळाले आहे. तर रविंद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर विराट कोहलीचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात पाच एकदिवसीय सामने, तीन टी२० सामन्यांची मालिका त्यांना खेळायची आहे.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रविंद्र जडेजा.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॅम लाथम, मार्टिन गुप्टिल, कोलिन डे ग्रांडहोमे, ट्रेंट बोल्ट, हेनरी निकोल्स, डग ब्रासवेल, लोकी फग्युर्सन, मॅट हेनरी, कोलिन मुनरो, ईश सोढी, मिशेल सेंटनेर, टिम साउथी.


VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयावर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2019 07:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...