Live cricket score, India vs Australia, 1st ODI: रो'हिट'ची खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाचा ३४ धावांनी विजय

Live cricket score, India vs Australia, 1st ODI: रो'हिट'ची खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाचा ३४ धावांनी विजय

India vs Australia 1st ODI Live Score, Ind vs Aus | Live Cricket Scorecard, Updates and Commentary

  • Share this:

सिडनी, 12 जानेवारी : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ५० षटकांत २५४/ ९ धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने भारताचा ३४ धावांनी पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ १- ० ने आघाडीवर आहे. अवघ्या चार धावांमध्येच ३ विकेट गमावणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित शर्मा १३३ आणि धोनीने ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. रोहित आणि धोनीमध्ये चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी झाली. मात्र ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने धोनीला बाद केले.

शिखर धवन, विराट कोहली आणि अंबाती रायडू अवघ्या चार धावांमध्येच तंबूत परतले. भारताने पहिल्या चार षटकांत ४ धावा काढत ३ विकेट गमावल्या. यातील एक विकेट जेसन बेहरेनडॉर्फने तर दोन विकेट रिचर्डसनने घेतल्या. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात जेसन बेहरेनडॉर्फने पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर शिखर धवनला एलबीडब्ल्यू करत बाद केले.

ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ५ गडी गमावत २८८ धावा केल्या. भारताला पहिला सामना जिंकण्यासाठी ५० षटकांत २८९ धावा करणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियासाठी पीटर हँड्सकॉम्बने सर्वाधिक ७३ (६१) धावा केल्या. त्यानंतर उस्मान ख्वाजा ५९ (८१), शॉर्न मार्श ५४ (७०) यांनी सर्वाधिक धावा केल्या. मर्क्युस स्टोनिस (४७) आणि ग्लेन मॅक्सवेल (११) धावांवर नाबाद राहिले. भारताकडून कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २ गडी बाद केले तर मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाने याआधी कधीही ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ कसोटी मालिकेप्रमाणेच ही एकदिवसीय मालिका जिंकून इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आधीच त्यांच्या ११ खेळाडूंची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाच्या टीम मॅनेजमेंटने ११ खेळाडूंच्या निवडीमध्ये कोणताही नवीन प्रयोग केलेला नाही. त्यांनी भरवशाच्या खेळाडूंनाचं पसंती दिली. यामुळेच युवा खेळाडू एश्टन टर्नरला संघात स्थान देण्यात आलं नाही.

या सामन्यात फिंच यष्टीरक्षक फलंदाज एलेक्स कॅरीसह सलामीवीर म्हणून उतरले. २०१७ मध्ये उस्मान ख्वाजाने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने या सामन्यातून संघात पुनरागमन केलं. त्याच्यानंतर शॉन मार्श फलंदाजीसाठी उतरेला. पीटर हँड्सकॉम्बही जवळपास दीड वर्षानंतर एकदिवसीय सामना खेळणार आहे.

मार्कस स्टोइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात निवड करण्यात आली आहे. जलदगती गोलंदाजीची जबाबदारी  पीटर, सिडल, झाए रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फ यांच्या खांद्यावर आहे. विशेष म्हणजे बिली स्टेनलेक आणि एडम जांपा यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. मात्र जो ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेत होता त्याहून जास्त चांगला संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये आहे. त्यामुळे भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावालं लागणार आहे यात काही वाद नाही. कसोटी मालिकेत फलंदाज आणि गोलंदाज यांची समसमान कामगिरी होती. मात्र एकदिवसीय सामन्यात भारताची पूर्ण मदार गोलंदाजांवर असेल.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद और मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलियाचा संघ: एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नाथन लियोन, पीटर सिडल, झाय रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ.

VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन

First published: January 12, 2019, 8:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading