S M L

Live Cricket Score, India vs Australia, 1st Test: १२३ धावांची खेळी खेळत पुजारा 'रन आऊट', पहिल्या दिवशी भारत २५०- ९

भारताकडून फलंदाज चेतेश्वर पुजाराने एकहाती किल्ला लढवत भारताला २५० पर्यंत मजल मारण्यास सहाय्य केलं.

Updated On: Dec 6, 2018 01:34 PM IST

Live Cricket Score, India vs Australia, 1st Test: १२३ धावांची खेळी खेळत पुजारा 'रन आऊट', पहिल्या दिवशी भारत २५०- ९

एडिलेट, ०६ डिसेंबर २०१८- पहिला दिवसाचा खेळ संपत भारताने ८७.५ षटकात नऊ गडी गमावत २५० धावा केल्या. भारताकडून फलंदाज चेतेश्वर पुजाराने एकहाती किल्ला लढवत भारताला २५० पर्यंत मजल मारण्यास सहाय्य केलं. एकट्या पुजाराने २५० पैकी १२३ धावा केल्या. इतर ८ फलंदाजांनी मिळून फक्त १२७ धावा केल्या. पुजाराने २४६ चेंडूत १२३ धावा करुन कसोटी सामन्याला साजेशी फलंदाजी केली. केएल राहुल, मुरली विजय, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत तंबूत परतले. एडिलेड कसोटी सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


पुजाराशिवाय रोहित शर्माने ३७, ऋषभ पंत आणि आर. अश्विनने प्रत्येकी २५, विराटने ३, के.एल. राहुलने २, अजिंक्य रहाणेने १३, मुरली विजयने ११ आणि इशांत शर्माने ४ धावा केल्या. मोहम्मद शमी ६ धावा करत नाबाद आहे. भारताचा ११ वा फलंदाज जसप्रीत बुमराह अजून फलंदाजीसाठी यायचा आहे. तो उद्या फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.


धावांचा डोंगर उभा करण्याचा विराटचा मनसुबा दुसऱ्या षटकातच मातीमोल झाला. दुसऱ्या षटकात केएल राहुलला हेजलवुडने अवघ्या दोन धावांवर बाद केले. त्यानंतर मिचेल स्टार्कने मुरली विजयला ११ धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. तो डाव सांभाळेल असं वाटत असतानाच अवघ्या ३ धावा करुन तोही बाद झाला. कोहलीने रोहित शर्माला यावेळी ६ व्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला.

Loading...


ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, पॅट कमिंस, नाथन लियोन आणि जोश हॅजलवूड यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. ट्रेविस हेडला एकही गडी बाद करता आला नाही. हेडने फक्त २ ओव्हरची गोलंदाजी केली. यातील एक ओव्हर त्याने मेडन टाकली तर दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या २ धावा दिल्या. आजचा पूर्ण दिवस हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी गाजवला असेच म्हणावे लागेल.


आत्मविश्वासाने भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध गुरूवारपासू सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामना जिंकण्यासाठीच उद्या मैदानात उतरेल. ७० वर्षात पहिल्यांदा सीरिज जिंकणं हे भारताचं लक्ष्य असणार आहे. आतापर्यंत भारताने परदेशात फार आश्वासक कामगिरी केलेली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती न करण्याचाच कोहलीच्या संघाचा प्रयत्न असेल. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये सीरिज गमावल्यानंतर जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक कोहलीसाठी ही सीरिज फार महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अनुभवी नसल्यामुळे त्याचा फायदा टीम इंडियाला घेता येईल. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर भारतने आतापर्यंत ४४ कसोटी सामने खेळले असून त्यातील फक्त ५ सामने जिंकले आहेत.


भारतीय संघ- मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.


ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंडसकॉम्ब, ट्रेविस हेड, टिम पेन (यष्टीरक्षक / कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हॅजलवूड, नाथन लियोन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 06:34 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close