Home /News /sport /

स्मृती मंधाना आणि जेमिमाला आव्हान देण्यासाठी चिमुरडी सज्ज, पाहा VIDEO

स्मृती मंधाना आणि जेमिमाला आव्हान देण्यासाठी चिमुरडी सज्ज, पाहा VIDEO

गेल्या काही वर्षांपासून महिला क्रिकेटची (women cricket) लोकप्रियता वाढत आहे. सध्या व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडीओ पाहून भारतीय महिला क्रिकेटचं भविष्य देखील उज्ज्वल असल्याची खात्री पटते.

  मुंबई, 26 मे: आपल्या देशात क्रिकेटला धर्माचा दर्जा आहे. गेल्या काही वर्षांपासून महिला क्रिकेटची (women cricket) लोकप्रियता वाढत आहे. क्रिकेटमध्ये करियर करणाऱ्या महिलांची वाढलेली संख्या हे याचं उदाहरण आहे. सोशल मीडियावर (Social Media) सध्या व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडीओ पाहून भारतीय महिला क्रिकेटचं भविष्य देखील उज्ज्वल असल्याची खात्री पटते. हा व्हायरल व्हिडीओ केरळमधील महक नावाच्या मुलीचा आहे. ही चिमुरडी अगदी सहज क्रिकेटचे सर्व शॉट्स खेळत आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, पुल आणि फ्लिक हे शॉट्स ती अगदी सहज लगावते.  महकची बॅटिंग पाहणाऱ्या प्रत्येका जण आश्चर्यचकित होत आहे. ही चिमुरडी इतक्या लहान वयात हे सर्व शॉट्स इतक्या सफाईने कशी खेळते, याचं सर्वांना आश्चर्य आणि कौतुक आहे. जेमिमाने केली प्रशंसा महकच्या बॅटींगचा व्हिडीओ इन्स्टाग्राम युझर @shams_oftabriz यांनी शेअर केला आहे. त्याला 'केरळची लहान महक' असं कॅप्शन दिलं असून यामध्ये त्याने स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि जेमिमा रोड्रिग्स (Jemimah Rodrigues) या भारतीय टीमच्या खेळाडूंना टॅग करत तुम्हाला आव्हान देण्यासाठी सज्ज असे म्हंटले आहे. महकची बॅटींग पाहून जेमिमा चांगलीच खूश झाली असून तिनं या चिमुरडीची प्रशंसा केली आहे.
  'दोन मुलींचा बाप म्हणून अस्वस्थ आहे,' शाळेत घडलेल्या घटनेमुळे अश्विन व्यथित यापूर्वी स्टम्पनं बॅटींग करणारा  केरळच्या 9 वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या मुलाची बॅट लॉकडाऊनमध्ये तुटली होती. त्यानंतर त्यानं स्टम्पनं सराव करण्यास सुरुवात केली, आणि अगदी कमी कालावधीत तो स्टम्पनं देखील अगदी सहज बॅटींग करु लागला. राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) पाहिला. त्यानं आपल्या फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांना हा व्हिडीओ फॉरवर्ड केला. त्याची माहिती समजल्यावर या फ्रँचायझीनं या मुलाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket, Video viral

  पुढील बातम्या