मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

इंग्लंडच्या Jos Buttler वर टीम इंडियाचा वासीम जाफर भलताच खूश; शेअर केले भन्नाट मीम्स

इंग्लंडच्या Jos Buttler वर टीम इंडियाचा वासीम जाफर भलताच खूश; शेअर केले भन्नाट मीम्स

Jos Buttler

Jos Buttler

इंग्लंडच्या जॉस बटलरने (Jos Buttler) यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup) पहिलं शतक झळकावलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात (England vs Sri Lanka) जॉस बटलरने 67 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 1नोव्हेंबर: इंग्लंडच्या जॉस बटलरने (Jos Buttler) यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup) पहिलं शतक झळकावलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात (England vs Sri Lanka) जॉस बटलरने 67 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले. त्याच्या या खेळीचे क्रिकेट जगतात सर्वत्र कौतुक होत असतानाच टीम इंडियाचा माजी खेळाडू वासीम जाफर (wasim jaffer) भलताच खूश झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने भन्नाट मीम्स शेअर करत जॉस बटलरचे कौतुक केले आहे. जाफरसह जाफर हरभजन सिंहनेदेखील ट्विट केले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात (England vs Sri Lanka) जॉस बटलरने 67 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले. बटलरच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जॉस बटलरने याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातही 32 बॉलमध्ये नाबाद 71 रन केले होते. कांगारूंविरुद्ध बटलरने 5 फोर आणि 5 सिक्स लगावल्या होत्या. बांगलादेशविरुद्ध बटलरने 18 रन केले, तर वेस्ट इंडिजविरुद्ध तो 24 रनवर नाबाद राहिला.

त्याच्या या झंझावती खेळीनंतर टीम इंडियाचे माजी खेळाडूंही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'कठीण खेळपट्टीवर एक मास्टरक्लास' असे म्हणत जाफरने भन्नाट मीम्स शेअर केले आहे. तर हरभजन सिंहने जॉस हा बॉस आहे. असे ट्विट करत बटलरच्या खेळीचे कौतुक केले आहे.

तसेच, इंडियन कमिंटर हर्ष भोगले यांनीदेखील ट्विट करत 'T20 क्रिकेटमध्ये सध्या जगात जोस बटलरपेक्षा चांगला सलामीवीर दुसरा कोणी नाही.' असे म्हटले आहे.

जॉस बटलरचं टी-20 आंतरराष्ट्रीयमधलं हे पहिलंच शतक आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 स्टेजमध्ये इंग्लंडची टीम दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे. तीन पैकी तीन सामने जिंकल्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे, त्यामुळे इंग्लंडचं सेमी फायनलमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे.

First published:

Tags: England, T20 cricket, T20 league