पाकिस्तानचा दिग्गज 'स्पिनर' अब्दुल कादीर यांचं हृदयविकाराने निधन

1980 च्या दशकात पाकिस्तानी संघाच्या यशात त्यांचा मोठा वाटा होता. नंतर त्यांनी शेन वॉर्न आणि मुश्‍ताक अहमद यांच्या सारख्या दिग्गज बॉलरलाही धडे दिले होते.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 06:31 AM IST

पाकिस्तानचा दिग्गज 'स्पिनर' अब्दुल कादीर यांचं हृदयविकाराने निधन

लाहोर 7 सप्टेंबर : पाकिस्‍तान (Pakistan)चा अतिशय दिग्गज क्रिकेट खेळाडू अब्‍दुल कादिर (Abdul Qadir) यांचं निधन झालंय. ते 63 वर्षांचे होते. 'स्पिनर' अशीच त्यांची जगभर ख्याती होती. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. 16 वर्षांच्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमधल्या कारकिर्दीत त्यांनी 67 टेस्‍ट आणि 104 वनडे मॅचेस खेळल्या होत्या.

त्यांनी टेस्‍ट मॅचेसमध्ये 236 तर वनडे त 132 विकेट घेतल्या होत्या. 5 वनडेमध्ये ते पाकिस्तानी संघाचे कॅप्टनही होते. निवृत्तीनंतर ते समालोचक झाले. नंतर ते पाकिस्तानी निवड संघाचे अध्यक्षही होते. 15 सप्टेंबर 1955मध्ये लाहोरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलंय.

(भारताच्या माजी क्रिकेटपटूवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप)

'गुगली'चे उस्ताद

अब्दुल कादीर हे ज्या पद्धतीने बॉल स्पिन करत होते त्याची अनेक मोठ्या खेळाडूंनाही भीती वाटत होती. ते दोन पद्धतीने 'गुगली' टाकत होते असंही म्हटलं जात होतं. त्याच्या करियरमध्ये इम्रान खान यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या बॉलिंगच्या कौशल्यामुळे त्यांना डान्सिंग बॉलर असंही म्हटलं जातं असे.

Loading...

1980 च्या दशकात पाकिस्तानी संघाच्या यशात त्यांचा मोठा वाटा होता. नंतर त्यांनी शेन वॉर्न आणि मुश्‍ताक अहमद यांच्या सारख्या दिग्गज बॉलरलाही धडे दिले होते.

(नव्या वाहतूक नियमांचा विराटला फटका, PHOTO शेअर करताच...)

56 रन्स देत 9 'विकेट'चा विक्रम

कादीर यांनी इंग्लंडच्या विरोधात कायम उत्तम प्रदर्शन केलं होतं. 1987मध्ये पाकिस्तानात झालेल्या टेस्ट सामन्यांमध्ये त्यांनी 30 विकेट घेतल्या होत्या. एका सीरिजमधलं त्यांचं ते सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होतं. याच सामन्यांमध्ये त्यांनी 56 रन्स देत 9 विकेट घेतल्या होत्या. कुठल्याही पाकिस्तानी खेळाडूची ती तोपर्यंत टेस्टमधली ती सर्वात चांगली कामगिरी होती. कादीर यांनी 1983 आणि 1987 असे दोन वर्ल्‍ड कप खेळले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 06:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...